माझी तुझी रेशीमगाठ : परीने आईसोबत केलं सुंदर फोटोशूट - पुढारी

माझी तुझी रेशीमगाठ : परीने आईसोबत केलं सुंदर फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रंचड लोकप्रिय ठरलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील महाराष्ट्राची लाडकी परी मायरा आणि तिची आई प्राथना बेहेरे या दोघींनी आज ‘डाॅटर्स डे’निमित्त सुंदर असा फोटोशूट केलेला आहे. चाहत्यांनी मालिकेतील या मायलेकींच्या फोटोंना चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे.

Rashem Gath

बाॅलिवुडचा सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि गोड चिमुकली मायरा नुकत्याच सुरू झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या आपल्या अभिनयाची चांगलीच छाप सोडलेली आहे.

Rashem Gath

डाॅटर्स डेनिमित्त इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मायरा आणि प्रार्थना या दोघींना ‘अपने पास बहुत पैसा है’, अशी अक्षरं लिहिलेला शर्ट घालून फोटोशूट केलेला आहे. त्या दोघींच्या या फोटोंना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि काॅमेंट्स मिळत आहेत.

त्याचबरोबर गोड दिसणाऱ्या मायरानेही आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. यापूर्वी या मालिकेबद्दल बोलतना श्रेयस तळपदे म्हणाला की, “पुन्हा एकदा आपल्या मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे.”तसेच ही मालिका खूप वेगळी आहे. ही एक अनोखी प्रेमकथा आहे”

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच मालिकेमध्ये दिसणारी चिमुकली मायराने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर केलेलं आहे. मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. मायराबद्दल बोलताना श्रेयस म्हणतो, “मी मायरा सोबत खूप रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतरदेखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते. ती सेटवर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही.”

“मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं की, मायराला केव्हा आराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की, मी तिला एक दिवस तरी सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे.”

हे वाचलंत का? 

पहा व्हिडीओ : अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर 

Back to top button