Kirit Somaiya : INS विक्रांत घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून किरीट सोमय्या यांना क्लिन चिट
पुढारी ऑनलाईन : आयएनएस विक्रांत घोटाळाप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) टीमकडून क्लिन चिट मिळाली आहे. त्यामुळे या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमय्यांना मोठा दिलासा मिळत असल्याची चर्चा आहे.
INS विक्रांतला भंगार होण्यापासून वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीच्या कथित गैरवापराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने सोमय्या पिता-पुत्राने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Mumbai Police’s EOW team gives BJP leader Kirit Somaiya a clean chit in connection with the alleged misappropriation of funds collected to save aircraft carrier INS Vikrant from scrapping.
EOW filed a C Summary report before the Court last evening.
(File photo) pic.twitter.com/zLO8ExRG0f
— ANI (@ANI) December 15, 2022
या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या मुद्यावर बोट ठेवले होते. त्यानंतर सोमय्या यांना उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी अटकेपासून कायमस्वरूपी दिलासा दिला आहे. हा दिलासा वेळोवेळी वाढवण्यातही आला आहे. याप्रकरणीच EOW ने काल संध्याकाळी कोर्टासमोर सी सारांश अहवाल दाखल केला आहे.