INS विक्रांत घोटाळा प्रकरणात आता नील सोमय्यांना सुद्धा अटकपूर्व जामीन मंजूर | पुढारी

INS विक्रांत घोटाळा प्रकरणात आता नील सोमय्यांना सुद्धा अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : INS विक्रांत भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांचा याच प्रकरणात मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजून करण्यात आला. मागील काही महिन्यात महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आलेल्या समीर वानखेडे, परमवीर सिंग, रश्मी शुक्ला, राणे पिता पुत्र, आता सोमय्या पितापुत्रांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे.

INS विक्रांत भ्रष्टाचार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मागील आठवड्यात मंजूर केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा निल सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यामध्ये त्यांना आज (दि.२०) जामीन मंजूर झाला.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार कायम असल्याने गायब झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स चिकटवले होते. दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हजर होण्यास बजावले आहे.

किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.१८) सोमय्यांची आर्थिक गुन्हे विभागात तब्बल ३ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणी सोमय्यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. किरीट सोमय्या यांच्या चौकशीसाठी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले होते.

Back to top button