

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आयएनएस विक्रांतच्या नावाने पैसा गोळा करून ५८ कोटी रुपये लाटल्याचा आरोप झाल्यानंतर भूमिगत झालेले किरीट सोमय्या मुंबईत प्रकट झाले आहेत. किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावल्याचे दिसून येत आहे. ठाकरे सरकार माझ तोंड बंद करू शकत नाही, अटक करून जेलमध्ये टाकायची भाषा वापरण्यास सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. विक्रांतमध्ये दीड दमडीचा घोटाळा केला नसल्याचा दावाही सोमय्यांनी केला. सोमय्यांनी यावेळी ठाकरे कुटुबीयांवर आरोप करण्याची संधी सोडली नाही. महाविकास आघाडी सरकारचा घोटाळा बाहेर काढणारच असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भूमिगत का झाला होता ? असे विचारले असता सोमय्या यांनी थेट उत्तर न देता होमवर्क करण्यासाठी भूमिगत झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टिकास्त्र सोडले.
हे ही वाचलं का ?