आयएनएस विक्रांत निधी घोटाळा : किरीट सोमय्यांची तब्बल ३ तास चौकशी | पुढारी

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा : किरीट सोमय्यांची तब्बल ३ तास चौकशी

मुंबई; पुढारी ऑनलाईन

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सोमवारी सोमय्यांची आर्थिक गुन्हे विभागात तब्बल ३ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणी सोमय्यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. किरीट सोमय्या यांच्या चौकशीसाठी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले होते.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स चिकटवले होते. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. सोमय्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य करावे. तसेच त्यांनी १८ एप्रिलपर्यंत सलग चार दिवस सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर रहावे, असे न्यायालयाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले होते.

निधी घोटाळा प्रकरणात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चौकशीसाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांना समन्स बजावले होते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापुरात मतदारांनी भाजपला का नाकारलं ? | kolhapur elction 2022

 

Back to top button