सतेज पाटलांना अजित पवारांची ‘पुणेरी’ कोपरखळी ! पन्नाशीत राज्यमंत्रिपदावर खेळत बसलेत | पुढारी

सतेज पाटलांना अजित पवारांची 'पुणेरी' कोपरखळी ! पन्नाशीत राज्यमंत्रिपदावर खेळत बसलेत

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सतेज पाटलांना अजित पवारांची पुणेरी कोपरखळी : सतेज पाटील यांना त्यांचे वय विचारले ते म्हणाले आता पन्नाशीच्या आसपास आहे.अजूनही मला कळत नाही की, पन्नाशीला पोहचलेत तरी राज्यमंत्रीच काँग्रेस ठेवते, एवढ्यात राज्यमंत्री पदापर्यंत खेळत बसलेत, अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सतेज पाटील यांना मारली.

आकुर्डी येथील डॉ.डी.वाय.पाटील ज्ञानशांती स्कूलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना पाहतो की आदित्य ठाकरे आहे तरूण व्यक्तीमत्व आहे. मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यांच्यामध्ये धाडस काही कल्पना आणि व्हिजन आहे.

सतेज पाटलांना अजित पवारांची पुणेरी कोपरखळी

नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही 40 वर्षाचेही नव्हतो त्यावेळी जयंत पाटील, आर.आर.पाटील, दिलीप वळसे पाटील आम्हा सगळ्यांना कॅबिनेट मंत्री पद दिले. त्यामुळे आम्हालाही वाटायचे की आपल्याकडून काही तरी चांगले झाले पाहिजे. मग ते पुणे शहर असो वा पिंपरी चिंचवड शहर असो. ग्रामीण भाग असो त्यामध्ये आम्ही सर्वांनी हिरीरिने काम करण्याचा प्रयत्न केला.

राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. दोन्ही ठिकाणी मी काम केले आहे. या शहरानेच मला नेमून दिले. त्यामुळे मला माहिती आहे एखाद्या राज्यमंत्र्यांनी कितीही मनात आणले तरी जोपर्यंत त्याला कॅबिनेट मंत्री किंवा वरिष्ठ मंत्री करत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या मनात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या राबवायला त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button