सांगली : पुढारी फूड फेस्टिव्हलमध्ये तुफान गर्दी | पुढारी

सांगली : पुढारी फूड फेस्टिव्हलमध्ये तुफान गर्दी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : पुढारी कस्तुरी क्लब’ आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल खवय्ये आणि खरेदीदारांच्या गर्दीने ओसंडून वाहू लागला आहे. हा फेस्टिव्हल दि. 6 डिसेंबरपर्यंत विश्रामबाग परिसरात विलिंग्डन महाविद्यालयाच्या मैदानावर चालणार आहे.

रॉनिक व क्रेझी ऑईसक्रिम हे या प्रदशर्र्नाचे प्रायोजक आहेत. या प्रदर्शनात खवय्यांना तांबडा-पांढरा रस्सा, मटण बिर्याणी, वडा कोंबडा, चिकन बिर्याणी, कबाब, चिकन लॉलीपॉप, तंदूर, चिकन-65 ची मेजवानी मिळत आहे. शाकाहारी खवय्यांसाठीही विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत. पावभाजी, सँडवीच, झुणका-भाकर, गोबी मंच्युरियन, व्हेज पुलाव, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे.

खाण्यासोबत या फेस्टिव्हलमध्ये विविध स्टॉल्सवर चारचाकीपासून ते फर्निचरपर्यंत, आटाचक्की, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, फ्रीज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, कपडे, मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ब्रँडेड शूज, इमिटेशन ज्वेलरी यासारख्या असंख्य वस्तूंचा खजिना आहे. व्यावसायिक आणि खाद्यपदार्थांचे मिळून दीडशेहून अधिक स्टॉल आहेत. मुलांसाठी मनोरंजनाचे खेळही या प्रदर्शनामध्ये भरवण्यात आले आहेत. खाण्यासोबत खेळ आणि करमणूक करणार्‍या या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. खाद्य मेजवानीसोबत गाण्यांची मेजवानीही रसिकांना भावली. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता जुन्या हिंदी गितांचा कार्यक्रम, सहा वाजता जीव माझा गुंतला या मराठी मालिकेतील कलाकार पूर्वा शिंदे व ( श्वेता) प्रतीक्षा मुणगेकर (चित्रा) या येणार आहेत.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम

पुढारी कस्तुरी क्लबतर्फे सभासदांसाठी दि. 6 डिसेंबर फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. (त्यासाठी संंबंधितांनी आपले नाव 9607957576 या क्रमांकावर नोंदवावे.) सोबत विविध स्पॉट गेम, गाणी, डान्स असे धमाकेदार कार्यक्रम असणार आहेत. रविवारी संध्याकाळी सहा वाजता अली सफर प्रस्तुत ‘एक हसीन सफर’ हा सुफी संगीत आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा

Back to top button