Sangli : गायरान जमिनीच्या वादातून नरवाडमध्ये पारधी कुटुंबावर हल्ला | पुढारी

Sangli : गायरान जमिनीच्या वादातून नरवाडमध्ये पारधी कुटुंबावर हल्ला

मिरज; पुढारी वृत्तसेवा : नरवाड (ता. मिरज) येथे गायरान जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका वृद्धाला गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी दुचाकी जाळून झोपडीची नासधूस केली आहे.

या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये शिवाप्पा सुभाष पवार (वय 60), बाशी नागेश पवार (वय 30), लांजी शिवाप्पा पवार आणि लाली फायर काळे यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नरवाड येथे एक पारधी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबाने गावातील गायरान जमिनीवर शेड मारुन वास्तव्य केले आहे. या गायरान जमिनीवरील पारधी कुटुंबाचे वास्तव्य हलविण्याच्या कारणातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. याच वादातून गावातील 20-25 जणांनी गुरुवारी (दि. १) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित पारधी कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी जाऊन कुटुंबावर हल्ला केला. यामध्ये महिलांसह पुरुषांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत एका वृद्धास जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. तसेच हल्लेखोराने एक दुचाकी जाळली असून झोपडीची तोडफोड केली आहे. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालय उपचार करण्यात येत असून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Back to top button