Sangli : मिरजेतील बालविवाह आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेत शनिवारी रात्रीच्या सुमारास होणार असलेल्या सहा बालविवाह रोखण्यात पोलिस, बालकल्याण समितीला यश आले होते. या विवाहाचे आयोजन करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश बाल कल्याण समितीने दिल्याचे सांगण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, मिरज शहरातील एका ठिकाणी बालविवाह होणार असल्याची माहिती बालकल्याण समिती व चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली होती. पहाटेच्या सुमारास लग्न सोळा पार पडणार असल्याने रात्रीच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आणि जेवणावळ होणार होती.
हळद सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, मिरज शहर पोलिसाचे गुन्हे प्रकटीकरण पथक, साध्या वेशातील महिला पोलिस आणि चाईल्ड लाईन संस्थेच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाड टाकली.
यावेळी पथकाने दोन अल्पवयीन मुलींसह तिघांना ताब्यात घेतले होते. तिघींची रवानगी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तिन्ही मुलींच्या पालकांचा शोध घेण्यात आला आहे. उर्वरित तीन मुलींचे वय पूर्ण असल्याने त्यांची ओळख पटवून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पीडिता या सांगलीसह, पुणे कर्नाटक भागातील असल्याचे चौकशीत समोर आले. दरम्यान, मिरज शहरात अशा पद्धतीने बालविवाह गेल्या काही दिवसांपासून होत आहे. याची गांभिर्याने दखल घेण्यात आली आहे.
हेही वाचा
- रायगड : दारूमुक्तीसाठी आज खारघर शहर बंद
- कोल्हापुरातील पुलांच्या मजबुतीकरणासाठी हवेत ३ कोटी
- बीड : उसाच्या ट्रॉलीला धडकून तरुणाचा जागीच मृत्यू