नगर: 20 लाख 61 हजार मे. टन ऊस गाळप, अंबालिका गाळपात अव्वल; 17 लाख साखर पोत्यांची झाली निर्मिती | पुढारी

नगर: 20 लाख 61 हजार मे. टन ऊस गाळप, अंबालिका गाळपात अव्वल; 17 लाख साखर पोत्यांची झाली निर्मिती

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा: अहमदनगर जिल्हयातील 13 साखर कारखान्यांनी 28 नोव्हेंबर पर्यंत 20 लाख 61 हजार 135 मे टन उसाचे गाळप करून त्यापासून 17 लाख 24 हजार 200 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर दैनंदिन साखर उतारा 8.66 असा आहे.

जिल्हयातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे – अंबालिका (3 लाख 95 हजार 220 मे.टन) (3 लाख 64 हजार 600 साखर पोते). (10.60 साखर उतारा), मुळा (226910) (145350), (9.88), थोरात (225780) (145350), (11.70), ज्ञानेश्वर (222560) (188800) (10.70), सहकारमहर्षि नागवडे श्रीगोंदा (165730) (135150), (9.02), पदमश्री विखे पाटील (165200) (116150), (9.65), कुकडी (123500) (103650), (9.50), अशोक (118340) (106200) (11.52), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (109091) (97400) (9.75), वृध्देश्वर (97105) (83300), अगस्ती (86662) (78790), (10.32), केदारेश्वर (76450) (56750). (9.41), कर्मवीर शंकरराव काळे (48597) (41400), (9.31). याप्रमाणे गळीत झाले आहे.

साखरेच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला असून मागील गाळप हंगामात राज्यात तब्बल 137 लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले. क्षेत्र वाढल्याने एप्रिलअखेर हंगाम सुरुच होता. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे नियोजन साखर आयुक्तालयाने केले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ऊस गाळपास सुरूवात केलेली आहे.

नगर जिल्ह्यात 13 साखर कारखाने असून त्यातील 12 कारखान्यांनी मागच्या वर्षी उसाचे गाळप केले होते. ज्या कारखान्यांनी मागील गाळप हंगामातील शेतकर्‍यांची एफआरपी 100 टक्के दिली आहे, त्यांनाच गाळपाची परवानगी यंदा देण्यात आलेली आहे. त्यामुळे कारखाने जोमाने सुरू आहेत.

इथेनॉलच्या 18 प्रकल्पांची भर

राज्यात इथेनॉल निर्मीती देखील मोठया प्रमाणांत सुरू असुन चालू वर्षी 18 नवीन प्रकल्पांची भर पडली आहे.त्यामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. याचा फायदा शेतकर्‍यांनाही होणार आहे. केंद्र सरकारने इंधनामध्ये इथेनॉल मिश्रीत करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे इंधन स्वस्त होण्यास मदत मिळणार आहे.

Back to top button