ठाणे : दीपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपच्या महिला मोर्चाचा विरोध | पुढारी

ठाणे : दीपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपच्या महिला मोर्चाचा विरोध

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करण्यास ठाण्यातील भाजपच्या महिला मोर्चाने विरोध दर्शविला आहे. दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याने भाजप महिला मोर्चाने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला विरोध केला आहे.

अभिनेत्री दीपाली सय्यद या ठाकरे गटातून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत टेम्भी नाका येथील आनंद आश्रमात शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. दीपाली सय्यद आणि इतर पक्षातील काही पदाधिकारी देखील प्रवेश करणार आहेत. मात्र सय्यद यांचा प्रवेश आज होणार नसून त्यांचा प्रवेश उद्या होण्याची शक्यता आहे.

दीपाली सय्यद यांची योग्यता नसून ठाकरे गटात असताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आधी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे.

हेही वाचा

राष्ट्रपतींवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंत्री अखिल गिरी यांच्याविरोधात तक्रार दाखल  

कांद्याच्या भावात आणखी घसरण! शेतकरी हवालदिल 

ठाकरे पदपथावरील झाडांची दुरवस्था; बिबवेवाडी परिसरातील चित्र

Back to top button