Virat Kohli : विराट कोहली कर्णधारपद सोडणार; रोहित शर्माकडे नेतृत्‍व? | पुढारी

Virat Kohli : विराट कोहली कर्णधारपद सोडणार; रोहित शर्माकडे नेतृत्‍व?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय क्रिकेट संघ नेतृत्‍वात मोठा बदल होण्‍याचे संकेत मिळत आहे. टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेनंतर विराट कोहली (Virat Kohli) कर्णधारपद सोडणार अशी शक्‍यता आहे. विराट कोहली कर्णधारपद सोडणार हे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर वन डे आणि टी-२०साठी रोहित शर्माकडे कर्णधारपद जाण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. कसोटी सामन्‍यांसाठी संघाचे नेतृत्‍व विराटकडेच राहणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

विरोट कोहली (Virat Kohli) हा सध्‍या कसोटीसह वन डे आणि टी-२० या तिन्‍ही तिन्ही खेळाच्या प्रकारात संघाचे नेतृत्‍व करतो. तो भारताचा आजवरचा सर्वात यशस्‍वी कर्णधारांपैकी एक आहे. विराटनेच आता रोहित शर्मा बरोबर कर्णधारपदाची जबाबदारी शेअर करणार असल्‍याचे म्‍हटले आहे. यासंदर्भात मागील काही महिन्‍यांपूर्वी विराटने रोहित आणि संघ व्‍यवस्‍थापनाबरोबर दीर्घ चर्चा केल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

विराट स्‍वत:च सोडणार कर्णधारपद

विराटकडे सध्‍या कसोटीसह वन डे आणि टी-२० चेही कर्णधारपद आहे. या जबाबदारीचा परिणाम त्‍याच्‍या फलंदाजीवर होत आहे. आपल्‍या फलंदाजीला अधिक वेळ मिळावा, अशी विराटची इच्‍छा आहे. तसेच अद्‍याप आपल्‍या आणखी चांगली फलंदाजी करायची असल्‍याचेही त्‍याने स्‍पष्‍ट केले आहे. यामुळे विराट याने स्‍वत:हून वन डे आणि टी-२० चेही कर्णधारपद सोडण्‍याची तयारी दर्शवली आहे. विराट हा जगातील सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजापैकी एक आहे. भारतीय क्रिकेट संघ २०२२ आणि २०२३ असे सलग दोन वर्ष दोन विश्‍वचषक स्‍पर्धेत सहभागी होणार आहे. यावेळी विराटने आता पूर्णवेळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

कसोटीतील कर्णधारपदी राहणार कायम

विराटकडे कसोटीचे कर्णधारपद कायम राहणार आहे. विराट सध्‍या ३२ वर्षांचा आहे.पुढील पाच ते सहा वर्ष तो आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आणखी चकमदार कामगिरी करु शकतो. यामुळे त्‍याने केवळ कसोटीमध्‍ये कर्णधारपदावर कायम राहण्‍याचा निर्णय घेत पूर्णवेळ फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

२०१४मध्‍ये विराटकडे अचानक आली होती संघाची धुरा

विराटकडे २०१४मध्‍ये कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली होती. यावेळी भारतीय संघ हा ऑस्‍ट्रेलियाच्‍या दौर्‍यावर होता.

महेद्रसिंह धोनी याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत होण्‍याचा निर्णय घेतला होता.

यानंतर विराटकडे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्‍यात आले होते.

धोनीने २०१७मध्‍ये कर्णधारपद सोडल्‍यानंतर क्रिकेटमधील तिन्‍ही प्रकारच्‍या खेळांसाठी कर्णधारपद विराटकडे सोपविण्‍यात आले होते.

आतापर्यंत विराटने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्‍यात संघाचे नेतृत्‍व केले आहे. यामध्‍ये भारतीय संघाने ३८ सामने जिंकले. तर ९५ वन डे सामन्‍यांपैकी ६५ सामन्‍यांवर विजयाची मोहर उमटवली तर ४५ टी-२० सामन्‍यांपैकी २९ सामने भारताने जिंकले आहेत. त्‍यामुळेच विराट हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्‍वी कर्णधारांपैकी एक आहे.

हेही वाचलं का ? 

[visual_portfolio id=”36908″]

 

Back to top button