रितिका श्रोत्री झाली ‘मॅड’, ग्लॅमरस अवताराने वेडे झाले फॅन्स | पुढारी

रितिका श्रोत्री झाली ‘मॅड', ग्लॅमरस अवताराने वेडे झाले फॅन्स

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री रितिका श्रोत्री ‘मॅड’ झालीय. तिच्या ग्लॅमरस अवताराने फॅन्स वेडे झाले आहेत. ती आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव मॅड असं आहे. रितिका श्रोत्री ही विनायक माळीसोबत दिसणार आहे.

यूथ या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहे. तारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतो. या मॅडनेसमधूनच कधीकधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असतात. असाच ‘मॅड’ हा युथफूल, कलरफूल, रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. २०२२ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो. हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवून देऊ शकतो वा गोत्यातही आणू शकतो. वेडेपणाची हीच तुफानी झिंग घेऊन लेखक समीर आशा पाटील आले आहेत. दिग्दर्शन निखिल वि. खजिनदार यांनी केले आहे.

नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.
या चित्रपटाच्या निमित्ताने हटके जोडी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची तिने मने जिंकली आहेत.

दादूस येतोय भेटीला

सोशल मीडियाच्या माध्यमातून दादूस आपल्या भेटीला येणार आहे. हा दादूस म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी होय.

vinayak mali
vinayak mali

या दोघांची रोमँटिक सफर ‘मॅड’ चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

विनायक माळी वेगळ्याच अतरंगी अंदाजातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ठसकेबाज लव्हेबल ही अभिनेत्री विनायकसोबत कोणतं भन्नाट समीकरण आणते हे पाहावं लागेल.

समीर आशा पाटील पिक्चर्स आणि कथाकार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती आहे. समीर आशा पाटील आणि व्ही. जे. शलाका हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

Back to top button