चंद्रपुर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर कारवाई | पुढारी

चंद्रपुर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नवीन बियर शॉपीच्या परवान्यासाठी 1 लाखाची लाच मागीतल्या प्रकरणी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकासह तीन अधिकाऱ्यांवर आज (दि.7) कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींममध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचा समावेश आहे.

माहितीनुसार, तक्रारदार घुग्घूस (ता.जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत. त्यांचे घुग्घूस येथे “गोदावरी बार अॅन्ड रेस्टॉरंट” या नावाने बार आहे. तक्रादार यांना पुन्हा नवीन बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे परवाण्याकरीता अर्ज सादर केला होता.

परंतु, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुयम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रादार यांना आज या, उदया या असे म्हणून टाळाटाळ केली आणि परवाना मंजुर केला नाही. जर परवाना मंजूर करायचा असेल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील आणि स्वतः करीता १ लाख रूपये लाचेची मागणी केली होती.

परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी संजय पाटील, चेतन खारोडे यांच्या विरोधात चंद्रपूर येथील लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करुन आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला. दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना १ लाखाची मागणी करून कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचे मार्फतीने कार्यालयातच लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षकाचे संजय पाटील यांच्यासाठी ही लाच स्वीकारन्यात आल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. संदेश वाघमारे, पो. अ. राकेश जांभुळकर, पो.अ. प्रदिप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोकॉ सतिश सिडाम यांनी पार पाडली.

Back to top button