पुणे : शहर काँग्रेस पक्षामध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळ

पुणे : शहर काँग्रेस पक्षामध्ये लेटर बॉम्बने उडवली खळबळ
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहर काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा एका लेटर बॉम्बने पक्षात खळबळ उडवून दिली आहे. या पत्रात भाजपला पक्षाची गोपनीय माहिती पुरवणे. थेट पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यापर्यंत कसे षढ्यंत्र सुरू आहेत. यासंबंधीचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या शहरातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याकडे पत्र देण्यात आले आहे.

शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पाठविण्यात आलेले हे पत्र 'दै. पुढारी'च्या हाती आले आहे. शहराध्यक्ष बागवे यांनी बैठक बोलावली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी  ४ सप्टेंबरला काँग्रेस भवनात बूथ कमिट्यांची ही बैठक होती. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव या शहराध्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते.

त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक एका पदाधिकाऱ्याने घेतली. प्रदेश कार्यकारिणीमध्ये काम करणाऱ्या शहरातील तो ज्येष्ठ पदाधिकारी होता. शहराक्षध्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या परवानगीविना ही बैठक घेतली. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती.

या प्रकाराबाबत शहराध्यक्ष बागवे यांना पक्षाच्या एका नगरसेवकाने पत्र पाठवले. त्यांनी आक्षेप घेऊन काही गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हटलंय नक्की या 'लेटर बॉम्ब'मध्ये?

शहराध्यक्ष बागवे यांना उद्देशून या पत्रात म्हटले आहे की, आपल्या अनुपस्थितीत काही इसमांनी  बैठकीत कामकाज पुढे सुरू करण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती ही अंतर्गतरित्या भाजपशी जवळीक ठेवून पक्ष विरोधी कृत्य केले. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

संबंधित व्यक्तीच्या काँग्रेस पक्षाबद्दलची विश्वासार्हता, निष्ठाबाबत कार्यकर्तादेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. अशा व्यक्तीला आपल्या अनुपस्थितीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देणे ही आक्षेपार्ह बाब आहे.

अशा बैठकीतील गोपनीय माहिती, प्रभागातील पडद्यामागील घडामोडी भाजपला कळवण्यात येतात. त्याचा उपयोग निवडणुकीवेळी विरोधी पक्ष मोर्चेबांधणीकरीता वापरतात. असा अनेकांना पुर्वानुभव आहे .

काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीवर वर्षोनुवर्षे अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी तुष्टीकरणाचा खोटा आरोप केला जातो. ही बाब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अन्य जातीय संघटना वर्षोनुवर्षे समाजात ठसविण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक इतर समाज पक्षापासून काही प्रमाणात दूर जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

गैरसमजाच्या धुक्यातून आता कुठे पक्ष सावरत असताना बेजबाबदार प्रवृत्तीला अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांची बैठकीची सूत्रे देणे गैर आहे. सदर व्यक्तीने फेसबुक व इतर सोशल मीडियावर बैठकीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

यामुळे कॉंग्रेस निवडणुकीसाठी अल्पसंख्याक समाजाला प्राधान्याने विचारात घेते. असा पक्षास हानिकारक संदेश निवडणुकीच्या तोंडावर बहुजन समाजात पसरतो. ही बाब षढ्यंत्राचा भाग असून दुर्दैवाने आपण यास बळी पडत आहात.

ज्यांनी कॉंग्रेस पक्षाचा हक्काचा परंपरागत पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे बहाल करण्याची सुपारी घेतली. प्रत्यक्ष परिस्थिती बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशांना बाजूला सारणे हे आत्यंतिक गरजेचे आहे.

ज्यांच्यावर कोणत्याही सभासद अगर इच्छुक उमेदवार यांना काडीचा विश्वास नाही. अशा व्यक्तींना महत्त्वाची बैठक आयोजित करण्याची सूत्रे देऊ नयेत.

आपण उपस्थित नसल्यास बैठक पुढे ढकलावी. पण, पक्षद्रोही व्यक्तींना आपण पुन्हा पुन्हा आमच्यावर लादू नका, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.

हेही वाचलं का ? 

[visual_portfolio id="36908"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news