शेअरबाजार मध्ये निर्देशांक हळूहळू पण निच्छितपणे वर जात आहे. गुरुवारी शेअरबाजार बंद होताना निर्देशांक 58,305 होता तर निफ्टी 17,369 वर बंद झाला. बाजारात एकूण कल बघता निर्देशांक या आठवड्यात 60000 च्या आसपास जावा, तर निफ्टीही 18000 च्या वर जावा. आपण ज्या शेअर्सचा नेहमी गुंतवणुकीसाठी योग्य असा उल्लेख करतो, त्या प्रमुख शेअर्सचा नेहमी भाव खालीलप्रमाणे होते.
ओएनजीसी 122 रुपये, हेग 2243 रुपये, जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 294 रुपये, मन्नापुरम् फायनान्स 165 रुपये, बजाज फायनान्स 7430 रुपये, फिलीप कार्बन 245 रुपये, रेप्को होम्स 304 रुपये, जिंदाल स्टील 400 रुपये, मुथुट फायनान्स 1538 रुपये, केइआय इंडस्ट्रीज 793 रुपये, लार्सेन अॅड टूब्रो 1669 रुपये, लार्सेन अॅड टूब्रो इन्फोटेक 5434 रुपये, भारत पेट्रोलियम 491 रुपये, ग्राफाईट 630 रुपये, स्टेट बँक ऑफ इंडिया 432 रुपये, स्टील स्ट्रीप्स 1728 रुपये, पीएनबी हाऊसिंग 633 रुपये, भारती एअरटेल 686 रुपये.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी गणेश चतुर्थी निमित्त बाजाराला सुट्टी होती. बाप्पा पावला तर पुढील दोन आठवड्यात शेअरबाजार आणखी वर जावा.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समभागांची प्राथमिक विक्री नजीकच्या भविष्यात होणार आहे. या महामंडळाचा देशभरातील विस्तार बघता व सहस्रावधी एजंटांची संख्या बघता त्यासाठी खूप बँकांचा सहभाग लागणार आहे. शिवाय या व्यवस्थापनासाठी गोलमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, सिटी ग्रुप ग्लेेबल मार्केट्स इंडिया व नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅड सिक्युरिटीज या तीन आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांचाही समावेश आहे.
याखेरीज एसबीआय कॅपिटल मार्केट, जे.एम. फायनान्सिअल, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया आय.सी.आय. सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड या वित्तसंस्थाही व्यवस्थापन करणार आहेत. केंद्र सरकार आपला एल.आय.सी.चा हिस्सा (समभाग) परदेशी कंपन्यांनी खरेदी करावा याही प्रयत्नात आहे. परंतु असा हिस्सा विकण्याची तरतूद एलआयसी स्थापना करण्यासाठी केलेल्या कायद्यात नाही हा कायदा सर चिंतामणराव देशमुख यांनी केला होता. ही कंपनी संपूर्ण भारतीयच राहावी ही त्यामागील धारणा होती. त्यामुळे अशी विक्री करायचे ठरवल्यास त्याबाबतच्या कायद्यात पार्लमेंट समोर जाऊन सुधारणा करावी लागेल.
इक्विटी फंडांवर गुंतवणूकवार सध्या खूश आहेत. कारण तिथे त्यांना चांगला प्रमाणात परतावा मिळतो. आतापर्यंत गुंतवणूकदारांनी दरमहा गुंतवणुकीच्या सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट फॅन – (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात 3 क्विटी म्युच्युअल फंडात 8666 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
सलग सहाव्या महिन्यात गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंडाला पसंती दिली आहे. इक्विटी फंडांकडे गुंतवणूकदार आकर्षित होण्यामागे दोन कारणे आहेेत. त्यात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमें प्लॅन (एसआयपी) व न्यू फंड ऑफर्स यांचा समावेश होतो. अॅम्पी(असोसिएशन ऑफ म्युच्यूअल फन्स इन इंडिया)च्या आकडेवारीनुसार या गुंतवणुकीच्या ओघामुळे म्युच्युअल फंड उद्योगातील व्यवस्थापनांतर्गत जिंदगी ऑगस्ट 2021 अखेर 36.6 लाख कोटी रुपये झाली आहे.
जुलै 2021 मध्ये हा आकडा 35.32 लाख कोटी रुपये होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाच लाख कोटीपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. या सातही कंपन्यांचे बाजारमूल्य 61-28 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी लि. या दोन कंपन्यांनी 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांच्या यादीत नुकताच प्रवेश केला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. तिचे बाजारमूल्य आता 14.54 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (ढउड ) चा क्रमांक लागतो. तिथे बाजारमूल्य 14.19 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे मुंबई शेअरबाजारात नोंदवलेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 252.68 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.