Rishabh Pant : ‘ऋषभ पंत पाकिस्तान संघात असता तर; तो…’, माजी खेळाडूचे मोठे विधान | पुढारी

Rishabh Pant : ‘ऋषभ पंत पाकिस्तान संघात असता तर; तो...’, माजी खेळाडूचे मोठे विधान

पुढारी ऑनलाईन डेस्क : rishabh pant : टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. यामुळे चाहत्यांसह माजी खेळाडू नाराज झाले असून संघातील खेळाडूंना धारेवर धरले आहे. काहींनी तर संघाच्या खराब कामगिरीला रणनीती, कर्णधारपद तसेच खेळाडूंची निवड जबाबदार असल्याची जोरदार टीका केली आहे. दरम्यान, आता भारताचे उदाहरण देत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझनेही संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान त्याने, ‘जर ऋषभ पंत पाकिस्तान संघात असता तर तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला नसता,’ असे मत व्यक्त केले आहे.

ऋषभ पंत (rishabh pant) ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग आहे, परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. 24 न्यूजशी बोलताना वहाब रियाझ म्हणाला, ‘तुमची सिस्टीम मजबूत असेल तर या गोष्टी होणार नाहीत. सिस्टीम मजबूत कोण करतो? ज्या त्यावर होल्ड आहे. निवड प्रक्रिया अशी आहे की आमिर असो, उमर गुल किंवा शोएब अख्तर किंवा सोहेल तनवीर जर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेटचे निकष दिले गेले असतील… जर त्यांनी त्यात चांगली कामगिरी केली आणि ते तंदुरुस्त असतील तर त्यांना खेळण्यास प्राध्यन्य देणे गरजेचे आहे.’

वहाबने भारताचे उदाहरण देताना सांगितले की, ऋषभ पंतसारख्या (rishabh pant) प्रतिभावान खेळाडूला बाहेर ठेवून टीम इंडियाचा कर्णधार दिनेश कार्तिकला संधी देत ​​आहे. याला कारण म्हणजे त्यांना सामना पूर्ण करू शकेल अशा क्रमांकावर फलंदाजाची गरज आहे. अशा परिस्थितीत पंत दोन षटकार मारेल पण तो सामना जिंकून देऊ शकला नाही तर संघाचा पराभव होईल, असेही वहाबने सांगितले.

तो पुढे म्हणाले, ‘ऋषभ पंत (rishabh pant) हा एमएस धोनीनंतर भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकी खेळी साकारल्या आहेत. तो पाकिस्तानात असता तर कधीच वर्ल्डकपच्या सामन्यातून बाहेर बसला नसता. पण टीम इंडियाने त्याला बाहेर बसवले आणि तेही त्याच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देऊन. भारताला माहिती आहे की, पंत हा चांगला क्रिकेटपटू आहे, पण त्यांना त्या क्रमांकावर एका मॅच फिनिशरची गरज आहे. पंत तो दोन षटकार मारेल पण सामना जिंकून देऊ शकत नाही.’

Back to top button