पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat vs Rohit T20 World Cup : श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. पण यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात. यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रन मशिन विराट कोहली यांचा सामवेश आहे. कोहली या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 62 धावा केल्या, तर पाकिस्तान विरुद्ध नाबाद 82 धावांची जादुई खेळी खेळली. दुसरीकडे रोहित शर्माने नेदरलँड विरुद्ध अर्धशतकी (53) केली. पण पाकविरुद्धच्या सामन्यात तो अपयशी ठरला आणि त्याने 4 धावा केल्या.
विराट कोहलीने आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 989 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर 904 धावा आहेत. हे दोन्ही भारतीय फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. आज जर किंग कोहलीने 11 धावा केल्या तर तो टी 20 विश्वचषकात 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनेल, तर 28 धावा करत तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम करेल. कोहलीचा फॉर्म पाहता तो द. आफ्रिकेविरुद्ध हा टप्पा पूर्ण करेल असे दिसते कारण यंदाच्या विश्वचषकात त्याला रोखणे अवघड असल्याचे दिसते. (virat vs rohit T20 World Cup virat kohli or rohit sharma who will score the most runs in t20 world cup)
दुसरीकडे, जर रोहित शर्मा विषयी चर्चा करायची झाल्यास, 904 धावांसह तो चौथ्या क्रमांकावर आहे. आज त्याने द. आफ्रिकेविरुद्ध 62 धावा केल्या तर तो या यादीत ख्रिस गेल (965) ला मागे टाकून तिसरा क्रमांक पटकावेल. दुसरीकडे, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा विराट कोहली पेक्षा 86 आणि महेला जयवर्धने (1016)पेक्षा 112 धावांनी मागे आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली जयवर्धनेला लवकरच मागे टाकेल. तर रोहितची बॅट तळपल्यस तो यावर्षी कोहलीलाही मागे टाकू शकतो. (virat vs rohit T20 World Cup virat kohli or rohit sharma who will score the most runs in t20 world cup)