Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा ट्विटरवर आता कॉमेडी होणार कायदेशीर
पुढारी ऑनलाईन: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर 44 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले. ट्विटर हातात येताच मस्क अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. ट्विटरची मालकी येताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल आणि कायदेशीर धोरण प्रमुख विजया गड्डे या दोघांमुळे भारतीयांसह सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसल आणि सीन एडगेट यांना काढून टाकले. यानंतर ट्विटरवर आता कॉमेडीही कायदेशीर असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.
Comedy is now legal on Twitter
— Elon Musk (@elonmusk) October 28, 2022
यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया ट्विटरवरील कंटेन्ट संदर्भात कंपनी कंटेंट मॉडरेशन कौन्सिल तयार करण्यात येणार असून, ती ट्विटर प्लॅटफॉर्मवर कंटेंट मॉडरेशनशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकेल. मात्र अद्याप कंटेंट संदर्भात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचेही एलन मस्क यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.
To be super clear, we have not yet made any changes to Twitter’s content moderation policies https://t.co/k4guTsXOIu
— Elon Musk (@elonmusk) October 29, 2022
ट्विटरचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर एलन मस्क 27 ऑक्टोबरला ट्विटर ऑफिसमध्ये फिरताना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी आपले ट्विटर प्रोफाइल देखिल बदलले आहे. त्यांनी प्रोफाइलमध्ये ट्विटर मुख्यालय असे केले आहे. त्यानंतर आज पक्षी मुक्त झाला असे ट्विट केले आहे.
हेही वाचा:
- Elon Musk : हातात वॉश बेसिन घेत, एलन मस्क पोहोचले ट्विटर मुख्यालयात (व्हिडिओ)
- Elon Musk : ट्विटरचे सीईओ पराग अगरवालसह अन्य अधिका-यांना मस्क यांनी काढले, ‘पक्षी मुक्त झाला’, ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांचे ट्विट
- Elon Musk buys Twitter – ट्विटर सोडल्यानंतर पराग अग्रवाल अब्जाधीश; मिळणार ‘इतकी’ भरपाई
- Elon Musk’s Twitter : ‘ब्राह्मणविरोधी’ आरोप झालेल्या अधिकाऱ्याचीही ट्विटरमधून हकालपट्टी