Elon Musk : हातात वॉश बेसिन घेत, एलन मस्क पोहोचले ट्विटर मुख्यालयात (व्हिडिओ) | पुढारी

Elon Musk : हातात वॉश बेसिन घेत, एलन मस्क पोहोचले ट्विटर मुख्यालयात (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन : टेल्साचे सीईओ एलन मस्क ट्विटर खरेदी करार फाईनल करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. यादरम्यान त्यांनी ट्विटरच्या मुख्यालयाला भेट दिली. तेव्हा ते हातात वॉश बेसिन घेऊन, मुख्यालयात पोहचल्याचे दिसले. एलन मस्क यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अब्जाधीश असलेले एलन मस्क जेव्हा सॅन फ्रांसिस्को येथील ट्विटरच्या मुख्यालयात पोहचले, तेव्हा त्यांच्या हातात वॉश बेसिन बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ स्वत: एलन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘Entering Twitter HQ – let that sink in! असा संदेश देखील त्यांनी या पोस्टसोबत लिहला आहे.

अमेरिकेच्या डेलावेअर कोर्टाने एलन मस्क आणि ट्विटर यांच्यातील कायदेशीर लढाईला स्थगिती दिली होती. यानंतर ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची कोर्टाने मुदत दिली आहे. यानुसार लवकरच एलन मस्क हे ट्विटरला आपल्या हातात घेणार असल्याचे संकेतही मस्क यांनी दिले आहेत.

एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये chief Twit (Twitter HQ) असे लिहित, ट्विटरचे प्रमुख होणार असल्याचे संकेत दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने या डीलसोबच जोडलेल्या व्यक्तींचा हवाला देत स्पष्ट केले आहे की, एलन मस्क यांनी ट्विटरला स्वत:कडे घेण्यासाठी १३ अब्ज डॉलर रक्कम देण्याची तयारी सुरू केली असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे टेस्ला, स्पेसएक्स कंपनीचे मालक एलन मस्क आता लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी करत याची मालकी स्वत:कडे घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एलन मस्ककडून Twitter चे तोंडभरून कौतुक

एलन मस्क यांनी ट्विटच्या मुख्यालयाला भेट देत वॉश बेसिन भेट दिले. यावेळी त्यांनी येथील अधिकारी आणि कर्मताऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ट्विटरचे तोंडभरून कौतुक देखील केली. ट्विटरला भेट दिल्यानंतर एलन मस्त यांनी ‘आज ट्विटरमधील अनेक छान लोकांची भेटत झाली. Twitter बद्दलची एक सुंदर गोष्ट म्हणजे नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता ते सक्षमपणे लोकांपर्यंत अनेक बातम्या पोहचवतात, असेही एलन मस्क यांनी आपल्या ट्विटरवरून भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा:

 

Back to top button