पुढारी ऑनलाइन डेस्क : Elon Musk : ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांनी पक्षी मुक्त झाला असे ट्विट केले आहे. तसेच ट्विटरचा ताबा घेताच एलॉन यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल सहित अन्य उच्च पदस्थ अधिका-यांना कामावरून काढून टाकले आहे. दरम्यान ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मस्क हे 75 टक्के कर्मचा-यांना कमी करणार आहेत, असे बोलले जात होते. मात्र, मस्क यांनी अशी कोणतीही योजना नाही असे म्हटले आहे.
एलॉन मस्क यांनी सर्वप्रथम मार्चमध्ये ट्विटरला खरेदी करण्याचा करार केला होता. मात्र नंतर ट्विटरने माहिती देण्यात आपली फसवणूक केल्याचा दावा करीत त्यांनी हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वाद मिटल्यानंतर एलॉन मस्क ही डिल पूर्ण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. शुक्रवारपर्यंत त्यांना ही खरेदी पूर्ण करायची होती.
Elon Musk : एलॉन मस्क यांचा ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण झाला असल्याची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तरीही न्यूयॉर्क टाइम्स, सीएनबीसी, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंग्टन पोस्ट आणि अन्य आउटलेट्सने दिलेल्या माहितीनुसार, सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसल सीन एडगेट आणि कानूनी नीति, ट्रस्ट आणि सुरक्षाप्रमुख विजया गड्डे यांना काढून टाकले आहे. विजया गड्डे यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत स्थायीरुपाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रांच्या अनुसार, ही डील पूर्ण झाली आहे.
बदल आवश्यक आहे, असे म्हणत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले मस्कचे अभिनंदन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विटरला खरेदी केल्याबद्दल मस्क यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की अनेक लोकांचे म्हणणे होते की बदल होणे गरजेचे आहे. माझे अकाउंट बॅकअप सहित सोमवारपर्यंत पुन्हा सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, ट्विटरचा व्यवहार पूर्ण केल्यानंतर एलन मस्क 27 ऑक्टोबरला ट्विटर ऑफिसमध्ये फिरताना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी आपले ट्विटर प्रोफाइल देखिल बदलले आहे. त्यांनी प्रोफाइलमध्ये ट्विटर मुख्यालय असे केले आहे. त्यानंतर आज पक्षी मुक्त झाला असे ट्विट केले आहे.
हे ही वाचा :