Elon Musk buys Twitter – ट्विटर सोडल्यानंतर पराग अग्रवाल अब्जाधीश; मिळणार ‘इतकी’ भरपाई | पुढारी

Elon Musk buys Twitter - ट्विटर सोडल्यानंतर पराग अग्रवाल अब्जाधीश; मिळणार 'इतकी' भरपाई

Elon Musk buys Twitter - ट्विटर सोडल्यानंतर पराग अग्रवाल अब्जाधीश

पुढारी ऑनलाईन – जगातील सर्वांत श्रीमंत उद्योपती एलन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्याने ट्विटरचे सीईओ आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. पण पराग अग्रवाल यांना कार्यमुक्त करण्यासाठी ट्विटरला फार मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. NDTVने दिलेल्या वृत्तानुसार अग्रवाल यांना ४२ अब्ज डॉलर इतकी भरपाई द्यावी लागणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम 3,457,145,328 रुपये इतकी होते.

एप्रिल महिन्यात मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याच वेळी अग्रवाल यांनी सीईओच्या पदावरून हटवले जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी Equilar या कंपनीने अग्रवाल यांनी मिळू शकणाऱ्या भरपाईचा अंदाज व्यक्त केला होता. या कंपनीनुसार दुसऱ्या कंपनीकडे ट्विटरची मालकी गेल्यानंतर एका वर्षात अग्रवाल यांना हटवले तर त्यांना 3,457,145,328 इतकी भरपाई मिळणार आहे. पराग अग्रवाल यांचे बेसिक वेतन आणि रोखे यांचा हिशोब करून ही भरपाई असेल. मस्क ट्विटरच्या एका शेअरसाठी ५४.२० डॉलर इतकी रक्कम मोजणार आहेत.

१४ एप्रिलला मस्क यांनी सिक्युरिट एक्सचेंजकडे या व्यवहाराची कल्पना देतानाच सध्याच्या व्यवस्थापनाबद्दल विश्वास वाटत नसल्याचे स्पष्ट केले होते. अग्रवाल यांचे वार्षिक वेतन ३०.४ दशलक्ष डॉलर इतके आहे. यातील बरीच रक्कम ही शेअरच्या रुपातील आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये सहसंस्थाप जॅक डॉर्सी यांनी अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती केली होती.

हेही वाचा

Back to top button