पिंपरी : कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या आत | पुढारी

पिंपरी : कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या आत

पिंपरी : शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या आता शंभरच्या आत आली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 7 रुग्णांवर तर, गृहविलगीकरणात 91 रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 26 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर, 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 235 संशयित रुग्णांवर आज कोरोना चाचणी करण्यात आली..

गेल्या आठवडाभरापूर्वी म्हणजे 22 तारखेला कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 159 इतकी होती. गेल्या सात दिवसांमध्ये ही संख्या घटत गेली आहे. गेले सलग दोन दिवस कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या आत आहे. 27 तारखेला 92 तर, 28 तारखेला 91 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 72 हजार 256 बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी 3 लाख 68 हजार 260 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 629 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Back to top button