अभ्यास कसा करावा? ‘या’ गोष्टींचे पालन करा

अभ्यास कसा करावा? ‘या’ गोष्टींचे पालन करा

शैक्षणिक आयुष्यात अभ्यास ही सर्वात प्राधान्याची गोष्ट आहे. परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. काही साध्या गोष्टींचे पालन करून अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावून घेता येतील.

विद्यार्थी दशेत यश प्राप्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन हे खूप अवघड कौशल्य असावे लागते. ते ज्यांच्याकडे असते त्यांच्यासाठी यश दूर नाही. अभ्यासाचे वेळापत्रक आधीच तयार करा. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यायचा ठरवून घ्या आणि त्याचे काटेकोर पालनही करा. अर्थात स्वतःवर ताण न येऊ देण्यासाठी आपल्या मनोरंजनासाठीही काही काळ राखून ठेवा.

आपल्याला दिलेल्या अभ्यासाविषयी उगाच चिंता करू नका. त्यापेक्षा तो अभ्यास करणे हे अधिक सोपी गोष्ट आहे. किती अभ्यास करायचा यापेक्षाही अभ्यास करणे हा अधिक चांगला पर्याय आहे.

आपल्या अभ्यासाविषयी काही विद्यार्थी खूपच सकारात्मक विचार करत असतात. तर काही विद्यार्थ्यांना अभ्यास नकोसा वाटत असतो. त्यामुळे अभ्यासासारख्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्याश्या वाटत नाहीत त्या करण्याबाबत आपण उदासीन असतो. आपल्या अभ्यासाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवा कारण भविष्यात त्याचाच फायदा होणार असतो.

आपल्याकडील स्रोतांचा हुशारीने वापर करा. एखादा अभ्यास करताना आपण मध्येच अडकले असू तर त्यासाठी मदत घ्या. आपल्याला दिलेला अभ्यास एकट्याने करता येणार नसेल तर उपलब्ध स्रोतांची मदत घेऊन अभ्यास करा.

काही वेळा खूप काम असते ते एकदम होणे शक्य नसते अशावेळी थोडे थोडे काम करत रहा. त्यामुळे अभ्यास करताना दमणूक होणार नाही आणि हार होणार नाही. आपण कोणता अभ्यास संपवला आहे याचा एकदा आढावा घ्या. त्यामुळे काम झाल्याचे समाधान लाभेल.

आपल्या मार्गात अडथळे येतच राहणार ही अगदी सामान्य बाब आहे, पण त्या परिस्थितीशी आपण कसे जुळवून घेतो किंवा तिला कसे सामोरे जातो. सतत शिकत राहण्याची वृत्ती बाळगायला शिकणे महत्त्वाचे आहे. एखाद्या परिस्थितीला शेवट झाला असे समजण्यापेक्षा त्यातून शिकणे अधिक योग्य. आपल्या शिक्षणासाठी पैसे गुंतवले अशी भावना ठेवा आणि त्यातून अधिकाधिक परतावा कसा मिळवता येईल याचा विचार करा. त्यामुळे अभ्यासाचे भान आणि महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे आपल्या रोजच्या दिनक्रमात अभ्यासाच्या चांगल्या सवयीं अंगी बाणवल्या तर आपल्यालाच फायदा होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news