कडक उन्हातून आल्यावर करू नयेत ‘या’ चुका… | पुढारी

कडक उन्हातून आल्यावर करू नयेत ‘या’ चुका...

सध्या देशभरात कडक उन्हाळ्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत. अशा वेळी काही साध्या वाटणार्‍या गोष्टींचीही काळजी घेणे क्रमप्राप्त ठरत असते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेची तीव्रता खूप असते. उन्हामधून घरी आल्यावर आपण अशा काही चुका करतो, ज्या आपल्या आरोग्याचे नुकसान करतात. चला जाणून घेऊया कडक उन्हातून घरी आल्यावर कोणत्या चुका करू नये याबाबत…

थंड पाणी पिणे- उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते. ज्यामुळे सर्दी-पडसे, गळ्यात खवखव यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. याकरिता उन्हामधून घरी आल्यावर थोडावेळ आराम करावा मग पाणी प्यावे.

अंघोळ करणे- उन्हामधून घरी आल्यावर लगेच अंघोळ करू नये. यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलू शकते. म्हणून उन्हातून घरी आल्यावर लागलीच अंघोळ करू नये.

एसीमध्ये बसणे- उन्हामधून घरी आल्यावर लगेच एसीमध्ये बसणे टाळावे. यामुळे शरीराला खूप नुकसान होऊ शकते. ताप येऊ शकतो तसेच, सर्दी-पडसे होऊ शकते.

जेवण करणे- उन्हाळ्यामध्ये घरी आल्यानंतर लगेचच जेवण करू नये. उन्हातून घरी आल्यानंतर जेवण केल्यास शरीराला त्रास होतो. जेवण पचायला समस्या येऊ शकते.

लगेच झोपणे- उन्हामधून घरी परतल्यानंतर झोपू नये. कमीतकमी एका तासानंतर झोपावे.

काय करावे

उन्हातून घरी आल्यावर हलके कोमट पाणी प्यावे. तसेच 15-20 मिनिटांनी अंघोळ करावी. 30 मिनिटांनी एसीमध्ये बसावे. तसेच 30 मिनिटांनी जेवण करावे मग 1 तासानी झोपावे. ही सावधानी बाळगून उन्हामधून घरी परतल्यानंतर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. शरीराचे तापमान सामान्य होण्यासाठी वेळ द्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Back to top button