सोलापूर : ऊसदर आंदोलनाचा भडका; आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या १२ टायरी फोडल्या | पुढारी

सोलापूर : ऊसदर आंदोलनाचा भडका; आंदोलकांनी ट्रॅक्टरच्या १२ टायरी फोडल्या

पंढरपूर / सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या उसाला घामाचे दाम योग्य मिळावे, यासाठी स्थापन झालेल्या ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन भरकटल्याचे पाहायला मिळाले. काही आंदोलकांनी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरी फोडल्या. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या श्री सुधाकरपंत पांडुरंग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा हा ट्रॅक्टर होता. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आंदोलकांनी धारधार सुरा वापरून, येणाऱ्या ट्रॅक्टरच्या १२ टायरी फोडल्या आहेत. वाखरी तालुका पंढरपूर येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली आहे.

ऊसदर संघर्ष समितीमध्ये गुन्हेगारी वृत्तीचे काहीजण शिरल्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता होतीच आणि तसेच घडले. काही व्यक्तींना उसदर आंदोलन हातात घेत, धारधार शस्त्राने कारखान्याच्या ट्रॅक्टरची टायरी फोडल्या आहेत. यामुळे वाहन मालकाचे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

चळे येथून सुधकारपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्यावर जाणारे वाहन थोरात पेट्रोल पंप वाखरी येथे अडवून त्याचे टायर फोडले. यामुळे शेतकरी आणि वाहन मालकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. मुळात पांडुरंग साखर कारखाना हा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर देतो. त्यामुळे अश्या कारखान्याची वाहतूक अडवण्याचा काय हेतू आहे? शेतकऱ्यांचे आणि शेतकरी संघटनेचे आंदोलन कोणाला हिंसक करायचे आहे? या आंदोलनातून गुन्हेगारी वृत्तीचे लोक पुढे येत आहेत का? असे अनेक प्रश्न या कृत्याने निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी संघटनांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. तसेच या हिंसक आंदोलनाची जबाबदारी स्वीकारावी लागणार असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button