Amitabh Bachchan House : बिग बींच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ कसं पडलं? | पुढारी

Amitabh Bachchan House : बिग बींच्या घराचे नाव 'प्रतीक्षा' कसं पडलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे चाहत्यांना सांगण्यासाठी अनेक किस्से आहेत. अमिताभ बच्चन केबीसी-१४ च्या सेटवरही आपल्या आयुष्यातील धडे घेऊन लोकांना काही ना काही सल्ले देत असतात. अलीकडेच शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ कसे आणि कोणी ठेवले याचा खुलासा केला. ‘बिग बीं’नी सांगितले की, त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या घराचे नाव ‘प्रतीक्षा’ ठेवले आहे. यामागेही एक रंजक कहाणी आहे.

कौन बनेगा करोडपती सीझन १४ मध्ये  स्पर्धकांची ओळख करून देताना अमिताभ बच्चन यांना कळले की स्पर्धकाच्या बहिणीचे नाव प्रतीक्षा आहे. यानंतर अमिताभ म्हणाले, ” प्रतीक्षा खूप सुंदर नाव आहे. माझ्‍या वडिलांनीही त्यांच्या घराचे नाव प्रतीक्षा ठेवले. लोक मला विचारतात की तू तुझ्या घराचं नाव प्रतीक्षा का ठेवलंस; पण मी त्यांना सांगतो की मी ते निवडलं नाही, माझ्या वडिलांनी हे नाव ठेवलं आहे.”

मी माझ्या वडिलांना विचारले होते की तुम्ही ‘प्रतीक्षा’ हे नाव का ठेवले? त्यांची एक कविता आहे ज्यात ‘स्वागत सबके लिए है पर नहीं है किसी के लिए प्रतीक्षा’ अशी ओळ आहे. म्हणून हे नाव ठेवण्यात आलं. प्रतीक्षा बंगल्यापासून १ किमी. अंतरावर त्यांचा जलसा नावाचा दुसरा बंगला आहे. तिथे आता बच्चन कुटुंबीय राहते.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात अमिताभ बच्चन अलीकडेच रुपेरी पडद्यावर दिसले होते. या चित्रपटात नागार्जुन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :  

Back to top button