HBD Nia Sharma : सर्वात हॉट टीव्ही अभिनेत्री नियाची संपत्ती आहे तरी किती?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीची सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री निया शर्मा आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. निया त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने खूपच अनोख्या अंदाजात स्वत:ची प्रतिमा निर्माण केलीय. इंडस्ट्रीमध्ये १२ वर्षे पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री बोल्ड आणि सिजलिंग लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. निया सध्या झलक दिखला जा १० मुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने आपल्या दमदार परफॉर्मन्सने परीक्षकांची मने जिंकत आहे. (HBD Nia Sharma)
निया शर्माचे नाव टीव्हीच्या हाएस्ट पेड अभिनेत्रींमध्ये होते. नियाची चर्चा देशातचं नाही तर परदेशातही होते. आपल्या हॉटनेसमुळे नियाने लाखों चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तुम्हाला माहिती आहे की, सर्वात हॉट आणि महागड्या या अभिनेत्रीची संपत्ती आहे तरी किती? (HBD Nia Sharma)
नियाची सुरुवातीची कारकीर्द
निया शर्माचा जन्म १७ सप्टेंबर, १९९० रोजी दिल्लीत झाला होता. निया शर्माचे खरे नाव नेहा शर्मा आहे आणि तिने २०१० च्या स्टार प्लस शो ‘काली – एक अग्निपरीक्षा’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिला ‘एक हजारों में मेरी बहेना है’ ही मालिका मिळाली. मात्र, २०११ ते २०१३ दरम्यान प्रसारित झालेल्या ‘एक हजारों में मेरी बेहना है’ या शोमधून नियाला सर्वाधिक यश मिळाले. या शोने नियाला रातोरात स्टार बनवले आणि आजही अनेक लोक तिला तिच्या पात्राने ओळखतात.
२०१४ मध्ये, तिने अक्षय कुमार निर्मित झी टीव्ही शो ‘जमाई राजा’मध्ये रोशनी पटेलची मुख्य भूमिका साकारली होती. या शोमध्ये त्याच्यासोबत रवी दुबे मुख्य भूमिकेत होता. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. निया शर्माने २०१७ मध्ये डिजिटल पदार्पण केले. तिने विक्रम भट्टच्या ‘ट्विस्टेड’ या वेबसीरिजने खूप चर्चेत आणले.
सेक्सी महिलांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर
टॉप ५० सेक्सी एशिया महिलांच्या यादीत निया तिसऱ्या क्रमांकावर आणि २०१७ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती.
View this post on Instagram
आलिशान घरे आणि कारची मालकीण
निया शर्माने काही वर्षांपूर्वी मुंबईत एक आलिशान घर घेतले होते आणि ती अनेकदा त्याचे फोटो शेअर करत असते. याशिवाय अभिनेत्रीकडे अनेक लक्झरी वाहने आहेत. तिच्याकडे ऑडी क्यू ७, व्होल्वो एक्ससी ९०, ऑडी ए ४ सारखी वाहने आहेत. फॅशन करण्या बाबत नियाची बरोबरी कुणीही करु शकत नाही. पण, याच फॅशनमुळे ती तिला अनेकदा ट्रोल केले गेले आहे. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या मानधनाबद्दल बोलायचे झाले तर, ती प्रत्येक एपिसोडसाठी ८० हजार रुपये घेते आणि मीडिया रिपोर्टनुसार, निया शर्माची एकूण संपत्ती ५९ कोटी रुपये आहे.
- युवकाचे अपहरण करून खंडणीसाठी मारहाण; शिरूर येथील प्रकार 13 जणांवर गुन्हा दाखल
- आळंदीत इंद्रायणीची पाणी पातळी वाढली
- पिंपरी : व्यावसायिकाला पावणेतीन लाखांचा गंडा
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram