Radhika Apte : हे बेट तुम्ही पाहिलं नसेल, पण राधिका गेलीय एकटीच

Radhika Apte :
Radhika Apte :
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'घो मला असला हवा', 'वाह लाइफ हो तो ऐसी' फेम आणि अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) सतत तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते. धाडसी राधिका सध्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी प्रशांत महासागरातील एका बेटावर पोहोचली आहे. तेथील तिच्या बिकिनीतील फोटोने चाहत्यांना भूरळ घातली आहे. या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेन्टसह ईमोजींचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte ) नुकतीच प्रशांत महासागरातील गॅलापागोस बेटावंर पोहोचली आहे. तेथीलच नेव्ही ब्ल्यू आणि व्हाईट बिकिनीतील एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटो शेअर करून राधिकाने बोल्डनेसचा तडका लावला आहे. या फोटोवरून ती एका जहाजात बसल्यासारखे दिसतेय. यातील खास म्हणजे, राधिकाने बिकिनीसोबत डोळ्यावर चष्मा परिधान केलाय. शिवाय तिने फोटोला पोझ देताना तिच्या हातांनी जहाजाच्या वरच्या बाजूस धरल्याचे दिसतेय.

या फोटोच्या कॅप्शममध्ये तिने 'Woke up from a dream of this time in the Galapagos. ?' असे लिहिले आहे. तर #ilovediving #lifeontheboat #imgoingdivingagain #oceanlover #memories #happymemories #littleturtletattoo? असे हॅसटॅगदेखील दिले आहे. या सगळ्यावरून मराठी अभिनेत्री सध्या परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे समजते. या फोटोत मात्र, समुद्र किंवा पाणी पाहायला मिळत नाही.

या फोटोवर 'Wow ?????', 'Outfit ??', 'Stunning ?❤️❤️❤️', 'Cutie pie ? lovely ❤️?', 'Hotness over load???', 'So hot ?', 'Princess ??', 'Wow so amazing ??', 'Hot ?❤️?', 'W?W so pretty ??', 'Beautiful❤️', 'Wowwww?', 'Superb ?', 'Stunning', 'very very hot', 'Wowww pretty woman ??', 'Ohh ?', 'OMS ?', 'Genuine ?', 'Hoty??', 'Looking great', 'Very nice??', 'sɪᴢʟʟɪɴɢ ??'. यासारख्या अनेक कॉमेन्टस मिळाल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास १ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

राधिका आपटे नवनवीन फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. राधिकाने तिचा करिअरची सुरुवात नाटकपासून केली होती. तिने एका पेक्षा एक चित्रपटात काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली. यात 'घो मला असला हवा', 'वाह लाइफ हो तो ऐसी', 'पॅडमॅन', 'मांझी द माउंटन मॅन', 'अहिल्या' या चित्रपटात काम केलं आहे. अभिनेता शाहिद कपूरसोबत 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून तिने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news