हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू | पुढारी

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ पंचायत समितीत गटविकास अधिकारी सखाराम बेले यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रूणवाल यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक झाली. यावेळी कुष्ठरोग शोध मोहीम अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 13 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत  कुष्ठरोग शोध मोहीम अभियान व सक्रिय क्षयरोग शोध मोहीम अभियान राबवले जाणारे आहे.

तालुक्यात 181 टीमद्वारे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. एका टीममध्ये एक स्त्री, आशा स्वंयसेविका व एक पुरुष स्वयंसेवक राहणार आहेत. तर पर्यवेक्षण करण्यासाठी 36 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही टीम प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणार आहे. सर्व नागरिकांनी आपली तपासणी करून घ्यावी. संशयित क्षयरोगाचे लक्षण हे दोन आठवड्यापासून येणारा खोकला व कुष्ठरोगासाठी न दुखणारा, न खाजणारा, बधीर फिकट चट्टा असतो‌. तेव्हा नागरिकांनी स्वतः हून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी सखाराम बेले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी यावेळी केले.

या बैठकीला वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डिडुळे, डॉ. पुरभा जमरे, डॉ. अतुल राऊत, डॉ. शितल मालु, डॉ. लक्ष्मण फड, बालविकास प्रकल्प विभागाचे प्रदीप खडसे, चक्रधर तुडमे, सर्जेराव पंडीत, अशोक डुकरे, अशोक चव्हाण, भगतसिंग पथरोड तसेच आरोग्य सहायक, आरोग्य सहायिका, गटप्रवृत्तक आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button