Team India Ranking : भारताचा पहिला क्रमांक हिसकावण्याचे पाकचे स्वप्न भंगले, चौथ्या स्थानावर घसरण | पुढारी

Team India Ranking : भारताचा पहिला क्रमांक हिसकावण्याचे पाकचे स्वप्न भंगले, चौथ्या स्थानावर घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Ranking : टीम इंडिया आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचली नसली तरी ICC T20 टीम रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी पहिला क्रमांक पटकावण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानला श्रीलंकेकडून सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता, त्यानंतर त्यांची क्रमवारीत घसरण झाली आणि संघ चौथ्या स्थानावर पोहचला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ टी-20 संघाच्या क्रमवारीत भारताच्या अगदी जवळ आला होता, परंतु सलग दोन पराभवांमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. हा संघ यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट सुपर 12 मध्ये पात्र ठरू शकलेला नाही. पण आशिया चषक चॅम्पियन बनून श्रीलंकन संघाने दाखवून आपले उपद्रवमुल्य दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे टी 20 मध्ये त्यांना हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करणार नाही. टी 20 पुरुष संघाच्या क्रमवारीत भारत 268 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोघांच्या खात्यात 258-258 गुण जमा आहेत. त्यानंतर न्यूझीलंड 252 गुणांसह पाचव्या आणि ऑस्ट्रेलिया सहाव्या स्थानावर आहे. (Team India Ranking)

Back to top button