Queen Elizabeth II Funeral : राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार | पुढारी

Queen Elizabeth II Funeral : राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा- ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी एलिझाबेथ यांच्या अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत. अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती १७ ते १९ तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौर्‍यावर असतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्‍टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले होते. स्कॉटलँडमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर विशेष विमानाने त्यांचा मृतदेह ब्रिटनमध्ये आणण्यात आला आहे. सध्या एलिझाबेथ यांचे पार्थिव बकिंगहम पॅलेसमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे.

जगभरातील प्रमुख नेते महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. परदेशी नेत्यांना हेलिकॉप्टर सेवा दिली जाणार नसून त्यांना बसने लंडनमध्ये नेले जाणार आहे. एलिझाबेथ यांचे पार्थिव लंडनमधील विंडसर येथील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपेलमध्ये दफन केले जाणार आहे.

हेही वाचा : 

 

 

 

 

Back to top button