Thalipeeth : साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आलाय? मग साबुदाण्याचं कुरकुरीत थालीपीठ ट्राय करा | पुढारी

Thalipeeth : साबुदाण्याची खिचडी खायचा कंटाळा आलाय? मग साबुदाण्याचं कुरकुरीत थालीपीठ ट्राय करा

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावण म्हंटला की उपवासाची रेलचेल. पण महिनाभर खिचडी, फळे, शेंगदाण्याचे लाडू, चिप्स हेच खावून थोडा कंटाळा येईल? तर थोडं इकडे लक्ष द्या. अगदी कमी वेळेत आणि तुमच्या जिभेला तृप्त करणारी उपवासाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ती म्हणजे साबुदाण्याचं थालीपीठ. (Thalipeeth) हे थालीपीठ अगदी कुरकुरीत होते. चला तर मग पाहूया साबुदाण्याची खिचडी.

Thalipeeth – साहित्य

तुम्ही किती माणसांसाठी आणि किती खाणार आहात त्याप्रमाणे साहित्य प्रमाण घ्या. जर का तुम्ही दोन माणसांसाठी आणि एकवेळच्या आहारासाठी साबुदाण्याची खिचडी करणार असाल तर

दोन वाटी साबुदाणा

तीन ते चार मिरच्या (थालीपीठ तिखट हवं असेल तर एक-दोन मिरच्या वाढवू शकता)

एक चमचा जीरेपूड

शेंगदाण्याचं कूट एक छोटी वाटी

उकडलेले दोन बटाटे

चवीनुसार मीठ

तेल/ तूप

Thalipeeth
Thalipeeth

कृती

प्रथम साबुदाणा पाण्यात न भिजवता मिक्सरवर थोडासा रवाळ बारीक करून घ्या

मिरच्या खलबत्यात वाटून घ्या

बारीक झालेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा व बारीक केलेल्या मिरच्या घालून घ्या

चवीनुसार मीठ घाला

साबुदाणा पूड, बटाटा आणि मिरच्या यांच्या मिश्रणात शेंगदाणा कूट घालून घ्या. आणि हे मिश्रण एकजीव करून घ्या

एकजीव केलेले मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या

त्यानंतर प्लास्टिकच्या एका कागदावर मिश्रणाचा गोळा हाताने थापून घ्या.

थालीपीठ जाड होणार नाही याची काळजी घ्या

नॉनस्टिक तव्यावर तूप किंवा तेल घाला. ते थापलेले थालीपीठ त्यावर घाला. त्यावर एक झाकण ठेवा

त्याला १ ते २ मिनिटे वाफ द्या

दोन्हीकडून खरपूस भाजून घ्या थालीपीठ.

थालीपीठ बरोबर तुम्ही आवडीप्रमाणे दही, ठेचा किंवा शेंगदाणा चटणी घेऊ शकता.

Thalipeeth
Thalipeeth

श्रावण विशेष : हेही वाचलंत का?

Back to top button