पुढारी ऑनलाईन डेस्क : व्रत- वैकल्याचा म्हणजे, श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात खास करून स्त्रिया आणि मुली भगवान शंकराची पुजा करतात. या व्रतादरम्यान केल्या जाणाऱ्या उपवासाचेही महत्व अधिक आहे. सामान्य महिला उपवासासाठी नेहमी फक्त साबुदाण्याची खिचडी करतात. काही वेळा अॅसिडीटी, गॅसची समस्या किंवा अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने पदार्थ केल्यास सर्वांनाच तो आवडतो. त्यामुळे खिचडी नको असेल तर स्पेशल उपवासाचे बटाटे वडे कसे करावे? हे जाणून घ्या…
२-३ उकडलेले बटाटे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर
लहान तुकडा आलं
अर्धा वाटी बारीच चिरलेली कोंथबिर
लहान एक वाटी वरीच्या तांदळाचे पीठ
लहान एक वाटी शेंगदाण्याचा कूट
३-४ हिरव्या मिरच्या
लिंबाचा रस
एक चमचा साखर
चवीपुरते मिठ
तळणीसाठी तेल
२-३ उकडलेले बटाटे एका भाड्यात घेवून ते बारीक करावेत.
बारीक केलेल्या मिश्रणात एक चमचा जिरं पावडर, हिरवी मिरची आणि आलं यांचे पेस्ट, बारीक चिरलेले कोथंबिर एकत्र घालून मिक्स करावे.
यानंतर यात वरून चवीपुरते मिठ आणि एक चमचा साखर घालावी. मिश्रणात वरून लिंबाचा रस मिसळा.
तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोल किंवा चपटे आकाराचा वडे तयार करून घ्या.
दुसऱ्या एका भाड्यात वरिचे पीठ आणि बारीक शेंगदाण्यांचा कुट एकत्रित करून घ्यावे.
या मिश्रणात लाल तिखट, चवीपुरते मिठ आणि एक चमचा थंड तेल घालावे.
संपुर्ण मिश्रण थोडे- थोडे पाणी घालून एकत्रित करावे. (टिप- कमी- जास्त न घालता ते मध्यम घालावे)
तयार झालेल्या मिश्रणात करून ठेवलेले वडे घालावे आणि संपुर्ण वड्याभोवती पीठ लागेल असे मिक्स करावे.
कढईत तेल घालून ते गॅसवर मंद आचेवर तापवावे.
तापलेल्या तेलात पिठात मिसळलेले बटाट्याचे वडे सोडावेत.
वड्यांना लाल रंग येईप्रयत्न आणि खुशखुशीत होईप्रयत्न तळून घ्यावे.
असे तयार झाले खमंग आणि खुशखुशीत उपवासाचे बटाटे वडे
हे उपवासाचे बटाटे वडे उपवासाची चटणी आणि दह्यासोबत सेव्ह करा. ( उपवासाचा बटाटे वडे)
हेही वाचलंत का?