Anveet Kaur : हे आहेत भारतीय संस्कार; अवनीतनं Cannesमध्ये असं काही केलं की…

Anveet Kaur
Anveet Kaur

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीपासून ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारी अभिनेत्री अवनीत कौर सध्या कान्समुळे चर्चेत आली आहे. अवनीतने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाल कलाकार म्हणून तिने काम केलं आहे. दरम्यान आता अवनीतने आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिमाखात हजेरी लावली आहे. कान्समधील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अवनीत कौरविषयी 'हे' माहित आहे काय?

  • अभिनेत्री अवनीत कौर कान्समध्ये रेड कॉर्पेटवर थिरकली.
  • अ‍वनीतने टिव्ही मालिका, शोसोबत अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
  • मर्दानी, चंद्र नंदिनी, अलादीन – नाम तो सुना होगा, आणि टिकू वेड्स शेरू या चित्रपटांतील अभिनयामुळे ती प्रकाश झोतात आली.
  • गोल्ड ग्लॅम आणि स्टाईल पुरस्कार, बॉलिवूड हंगामा स्टाईल आयकॉन्स या पुरस्कार तिला मिळालेत.

अवनीत कौरने कान्समध्ये असं केलं की…

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदा आपली अदाकारी दाखवली. यानंतर कियारा अडवाणीसह इतर अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर थिरकल्या. यानंतर आता २२ वर्षांच्या अवनीत कौरनेही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामुळे तिच्यावर सोशल मीडियात कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

अवनीतवर कौतुकाचा वर्षाव

नुकतेच अवनीत कौरचा तिच्या इन्स्टाग्रामवर कान्समधील रेड कार्पेटवरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी अवनीत ब्ल्यू कलरच्या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसली. या व्हिडिओत खास म्हणजे, अ‍वनीतने रेड कार्पेटवर जाताना सुरूवातील असणाऱ्या पायऱ्यावर येताच खाली वाकली आणि तिने पायऱ्यांना स्पर्श करून तिने आशिर्वाद घेतला. या तिच्या वर्तणुकीमुळे तेथे उपस्थित असणाऱ्यांनी आश्चर्यचकित केलं. इतकेचं नाही तर तिचे सोशल मीडियात भरभरून कौतुक केलं आहे.

अवनीतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याचदरम्यान एका यूजर्सने लिहिलं आहे की, 'ही आहे भारतीय संस्कृती'. हा व्हिडिला आतापर्यत १० लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. यासोबत अवनीत कौर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करून सक्रिय असते.

हेही वाचा 

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news