Shravan Special : उपवासासाठी खिचडी ऐवजी करा साबुदाण्याची गंजी | पुढारी

Shravan Special : उपवासासाठी खिचडी ऐवजी करा साबुदाण्याची गंजी

पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या श्रावण सुरू आहे. श्रावणापासून चातुर्मास सुरू होते. अनेकजण एकवेळ जेवण करून चातुर्मास करतात. तर काही लोक संपूर्ण श्रावण मास उपवास करतात. मात्र, दररोजच्या उपवासामुळे रोजच साबुदाण्याची खिचडी करणे शक्य होत नाही आणि ते आरोग्यासाठी देखिल अहितकारक आहे. त्यामुळे साबुदाण्यापासूनच झटपट होणारा दुसरा एक पदार्थाची ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा.

साबुदाण्याची गंजी याला अनेकजण साबुदाण्याची खीर असेही म्हणतात पण गंजी आणि खीरमध्ये थोडा फरक आहे. खीरमध्ये ड्रायफूट आणि साखरचे मिश्रण असते. तर गंजी ही फक्त साबुदाणा पाणी, दूध किंवा मीठ टाकून बनवायची असते.

साहित्य

एक वाटी साबुदाणा, एक तांब्या पाणी, चवीनुसार मीठ, (मीठ टाकून पिणार असाल तर दूध टाकू नये) एक मोठा कप दूध, साखर

खीर करायची असल्यास सुका मेवा एक वाटी, आणि तूप

कृती : गंजी बनवण्याची कृती खूपच सोपी आहे. पहिले एक वाटी साबुदाणा धुवून घ्या. आता एका भांड्यात एक तांब्या पाणी टाकून त्यामध्ये साबुदाणा चांगला उकळून घ्या. साबुदाणा तोपर्यंत उकळायचा आहे जोपर्यंत तो हलका होऊन त्यात चिकटपणा येत नाही. साधारणपणे चिकटपणा आला आणि साबुदाणा हलका वाटू लागला की गॅस बंद करा. तुम्ही ही गंजी फक्त मीठ टाकून खाऊ शकता. मात्र काही लोकांना दूध टाकून गंजी खायला आवडते. त्यांनी दुस-या एका पातेल्यात दूध गरम करून घ्या. गरम दूध उकळलेल्या गंजीत टाका त्यात चवीनुसार साखर टाका. थोडावेळ आणखी गरम करा. हे मिश्रण गरम-गरम कटोरीत काढून घ्या. हलके कोमट झाले की खा. खायला गंजी खूप चविष्ट लागते. सोबतच ही पचायला हलकी असल्याने पोटासाठी आरामदायक असते.

याचीच खीर करायची असल्यास सुका मेवा तुपात चांगला भाजून घ्या. गंजीमध्ये दूध साखर टाकून उकळल्यानंतर शेवटी हा सुकामेवा वरून टाका.

हे ही वाचा :

sabudana khichdi: अशी बनवा उपवासाची मऊ, लुसलुशीत साबुदाणा खिचडी

श्रावणात बनवा खमंग -खुसखुशीत स्पेशल उपवासाचे बटाटे वडे, वाचा रेसिपी

Back to top button