संजय राऊत यांनी स्‍वत: मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्‍न केले; त्‍यावर रोखठोक येऊ द्या : बावनकुळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा शिवसेना नेते खासदार संजय राऊत भ्रमिष्ट अवस्थेत 'रोखठोक' लिहित असावेत. २०१९ मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते. हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार? असा सवाल करताना बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात, बावनकुळे म्हणतात उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत, पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत 'रोखठोक' लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?

आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार.

२०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक 'रोखठोक' त्यावरही येऊ द्या! असे आव्हान त्‍यांनी दिले आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news