Singapore Open : पीव्‍ही सिंधुची ‘सिंगापूर ओपन’च्‍या फायलनमध्‍ये धडक, सेमीफायनलमध्‍ये जपानच्‍या कावाकामीवर मात | पुढारी

Singapore Open : पीव्‍ही सिंधुची 'सिंगापूर ओपन'च्‍या फायलनमध्‍ये धडक, सेमीफायनलमध्‍ये जपानच्‍या कावाकामीवर मात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्‍ही सिंधूने आज मोठ्या दिमाखात सिंगापूर ओपन सुपर 500 स्‍पर्धेच्‍या ( Singapore Open ) फायनलमध्‍ये धडक मारली. सेमीफायनलमध्‍ये तिने जपानच्‍या सेईना कावाकामीचा २१-१५, २१-७ असे सलग दोन सेट जिंकत पराभव केला.

 Singapore Open : केवळ ३२ मिनिटांत सामना निकाली

सेमीफायनल सामन्‍याच्‍या सुरुवातीपासूनच सिंधुने सामन्‍यावर आपली पकड निर्माण केली. पहिला सेटमध्‍ये १७-५ अशी निर्णायक आघाडी घेतली. माकत्र पहिला सेट २१-१५ असा जिंकल्‍यानंतर सिंधुने दुसर्‍या सेटमध्‍येही आपली दमदार कामगिरी कायम ठेवत ०-५ असा आघाडी मिळवली. यानंतर २४ वर्षीय सेईना कावाकामीच्‍या चुकांना अचूक हेरत सिंधुने सामन्‍यांवर पकड कायम ठेवत दुसरा सेटही २१-७ असा जिंकत फायनलमध्‍ये दिमाखात प्रवेश केला. केवळ ३२ मिनिटांमध्‍ये सलग दोन सेट ( २१-१५,२१-७) जिंकत पीव्‍ही सिंधुने आपले फायनलचे तिकीट पक्‍के केले.

आता सिंगापूर ओपन सुपर 500 स्‍पर्धेवर आपली मोहर उमटविण्‍यासाठी ती केवळ एक पाउल बाकी आहे. मे महिन्यात झालेल्या थायलंड ओपनमध्ये सिंधू सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button