Murali Sreeshankar : लांब उडीच्या फायनलमध्ये जाणारा पहिला भारतीय ठरला मुरली श्रीशंकर | पुढारी

Murali Sreeshankar : लांब उडीच्या फायनलमध्ये जाणारा पहिला भारतीय ठरला मुरली श्रीशंकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा मुरली श्रीशंकर (Murali Sreeshankar) शनिवारी अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. पात्रता फेरीत तो सातव्या स्थानावर होता. जगात १३व्या क्रमांकावर असलेला श्रीशंकर ८ मीटर उडी मारून हा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला. मुरली श्रीशंकरशिवाय अविनाश साबळेनेही दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. (Murali Sreeshankar)

Murali Sreeshankar
Murali Sreeshankar

या सीझनमध्ये आतापर्यंत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या श्रीशंकरने मे महिन्यात ८.३६ मीटरची लांब उडी घेतली होती. २३ वर्षांच्या श्रीशंकरने या सीझनमध्ये ग्रीसमधील एका स्पर्धेत ८.३१ मीटरची आणखी एक मोठी लांब उडी मारली होती. ज्यामध्ये त्याला ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रीसच्या मिल्टियाडीस टेंटोग्लूसोबत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये 8.23 ​​मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले. आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतीय लांब उडीपटू जेस्विन एल्ड्रिन आणि मोहम्मद अनीस याहिया यांनी अनुक्रमे ७.७९ मीटर आणि ७.७३ मीटरची लांब उडी घेतली. ते पुढील टप्प्यात पोहोचू शकले नाहीत. त्याच वेळी, अविनाश साबळे पुरुषांच्या लांब उडी आणि पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत पात्र ठरला.

 हे ही वाचा :

 

 

 

Back to top button