राज ठाकरे : ‘मी बाबासाहेबांकडे एक इतिहासकार म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून जात नाही’ | पुढारी

राज ठाकरे : 'मी बाबासाहेबांकडे एक इतिहासकार म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून जात नाही'

पुणे; पुढारी ऑनलाईन : राज ठाकरे : राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद फोफावल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. मी बोलण्यामागे महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर पडण्याच्या दृष्टीकोनातून होते असे ते म्हणाले.

मी प्रबोधनकार ठाकरे वाचले, यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत असे म्हणत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राज यांनी प्रबोधनकार वाचावेत या शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ समजला नसल्याचे ते म्हणाले. राज यांनी यावेळी आरक्षणावर भाष्य केले. आरक्षण मिळणार नसेल, तर स्पष्ट सांगा. माथी कशासाठी भडकावता असे ते म्हणाले.

राज म्हणाले की, आपण अजूनही जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही निवडणुकीच्या भाषणांमध्ये रस्ते, पाणी, विज अशी तीच आश्वासने दिली जातात. त्यामुळे एवढ्या वर्षांमध्ये आपण काय मिळवलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण १९९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण त्यानंतर द्वेष वाढला, हे माझं वाक्य होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो वाढला असेही मी म्हणालो होतो.

राज ठाकरे म्हणाले…

  • 74 वर्षांमध्ये आपण वैचारिक दृष्ट्या सुधारलो का? काय गमावलं, कमावलं हे शोधणं गरजेचं
  • 1999 मध्ये जातीपाती द्वेष वाढला हे माझं म्हणणं होतं
  • राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद उफाळला
  • सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोपडाचा चोपडे झाला
  • नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले
  • जातीचं वातावरण तयार केलं जातं आहे
  • बाबासाहेब पुरंदरे कडे जातो ते ब्राम्हण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो
  • निवडणुकीच्या काळात दोन-चार टाळक्यांच भलं होत
  • 74 वर्षांमध्ये तेच तेच राजकारण केलं होतंय, त्याच चिखलात अडकतोय
  • मी काय वाचतो, काय वागतो याच मला भान आहे.
  • पाहिजे तेवढे प्रबोधनकार घ्यायचे असं करूनही चालणार नाही.
  • जातीपातीच्या विचारातून बाहेर यायला असं वाटतं
  • गेल्या 15 – 20 वर्षांत शाळेत सुद्धा मित्रा मित्रांमध्ये जाती आल्या.
  • मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगायला हवं. माथी भडकवण्याचे काम करू नये
  •  मोदी विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान झाले. म्हणजे विकासाच्या मुद्यावर लोकं मतदान करतात.
  • बाबासाहेब पुरंदरे कडे मी इतिहास संशोधक म्हणून जातो ते ब्राम्हण म्हणून नाही
  • राजकारणात केवळ स्त्री पुरूष एवढच आरक्षण असायला हवं

हे ही वाचलं का?

राज ठाकरे काय म्हणाले? पहा पूर्ण व्हिडिओ 

Back to top button