डॉ. नरेंद्र दाभोलकर : मुंबईत एकाच वेळी 8 ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक | पुढारी

डॉ. नरेंद्र दाभोलकर : मुंबईत एकाच वेळी 8 ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईत सकाळी 7 ते 9 या वेळेत 8 ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आले.

घाटकोपरमध्ये भटवाडी ते सर्वोदय हॉस्पिटल व गणपती मंदिर ते घाटकोपर स्टेशन या दरम्यान दोन ठिकाणी; तर कुर्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जोगेश्वरी येथे इस्माईल युसूफ कॉलेज व दहिसर येथे जरी मरी गार्डन या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यात आले.

दादरमध्ये नायगाव मधील देवरुखकर मार्गावरील संविधान चौक येथून राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत पहिल्या मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. पुढे वरळी सी फेसला आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन पुतळ्याजवळून दुसरा मॉर्निंग वॉक सुरू झाला व शेवटी शिवाजी पार्क ते चैत्यभूमी या मार्गावरून शेवटचा मॉर्निंग वॉक करून चैत्यभूमीवर मुंबईतील या सर्व मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थित कार्यकर्ते, समविचारी, हितचिंतक व सजग नागरिक यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास अजूनही पूर्ण होत नाही व खुनाच्या सुत्रधारांचाही शोध लागत नाही, याबाबत निषेध व्यक्त केला व जोपर्यंत खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण ही मागणी नेटाने लावून धरू व याबाबत अधिकाधिक जनजागृती करू असा कृतीशील निर्धार व्यक्त केला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनानंतर जादूटोणा विरोधी कायदा झाला, पण त्याचे नियम अद्याप बनविले गेले नाही. ते त्वरीत बनवावे अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटिल, सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे यांना करण्यात आलेली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button