पुणे : एसटी चालकाची माळशेज घाटात आत्महत्या | पुढारी

पुणे : एसटी चालकाची माळशेज घाटात आत्महत्या

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : माळशेज घाटातील (जि. ठाणे) बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत उडी मारुन एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ८ जून) दुपारी घडली. गणपत मारुती इदे असे, आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव असून ते अकोले आगारात कार्यरत होते.

अकोले-कल्याण ही बस घाटात थांबली असता गणपत इदे यांनी दरीत उडी घेऊन आपले आयुष्य संपविले. इदे यांना मंगळवारीच (दि. ७) पगार मिळाला होता, मात्र एसटी संपानंतर पगार फारच कमी मिळाल्याची चर्चा होती. तसेच ते मानसिक तणावाखाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आत्महत्येनंतर १५० फूट दरीतुन इदे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जुन्नर आपत्ती व्यवस्थापन टीमला दोन तासांचा अवधी लागला. टोकावडे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रशांत कबाडी, रमेश खरमाळे, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, श्याम कबाडी, लखन डाडर, संकेत बोंबले आदींनी मदतकार्य केले.

हेही वाचलतं का?

Back to top button