Sidhu Moosewala Murder : संतोष जाधव, सौरभ महाकाळचा बॉस बिश्नोई जेलमधून गँग कशी सांभाळतो? | पुढारी

Sidhu Moosewala Murder : संतोष जाधव, सौरभ महाकाळचा बॉस बिश्नोई जेलमधून गँग कशी सांभाळतो?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील गायक सिद्धू मुसेवाला याच्या खून प्रकरणात पुण्यातील आंबेगाव येथील संतोष जाधव आणि जुन्नर येथील सौरभ महाकाळ यांची नावे पुढे आली आहेत. या खुनाचा मुख्य सूत्रधार असलेला लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये आहे. तिहार जेलमधून तो ७०० च्यावर गुन्हेगारांची टोळी चालवतो. फक्त ३२ वर्षांचा असलेला लॉरेन्स बिश्नोईचा गुन्हेगारी जगतातील उदय हा मतीगुंग करणार असाच आहे. (Sidhu Moosewala Murder)

विशेष म्हणजे लॉरेन्स बिश्नोई त्याची गँग तिहार जेलमधून चालवतो. द प्रिंट या वेबसाईटने लॉरेन्स बिश्नोई याच्या संदर्भातील पोलीस स्टेशनमधील कागदपत्रे तपासून एक सविस्तर वृत्तच दिलेले आहे. त्यात लॉरेन्स बिश्नोईच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Sidhu Moosewala Murder)

बिश्नोई २०११ आणि २०१२ या कालावधीत पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्या काळात त्याचा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध येऊ लागला. बिश्नोईचे गुन्हेगारीतील नेटवर्किंग अत्यंत तगडे मानले जाते. पंजाब विद्यापीठाच्या काही निवडणुकांत मारामाऱ्या, गोळीबार करणे असे प्रकार त्याने केले होते. (Sidhu Moosewala Murder)

२००८मध्ये गोळीबार प्रकरणात तो तुरुगांत होता. या वेळी रणजीत दुलपा या गुन्हेगारीशी त्याची चांगली मैत्री झाली. दुलपा हा शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम करतो. दुलपा सध्या अमेरिकेत असून तोच बिश्नोईला परदेशी बनावटीची शस्त्रास्त्रे पुरवतो. (Sidhu Moosewala Murder)

२०१४ ला बिश्नोई आणि गोल्डी ब्रार या दोघांनी लुधियाना महापालिका निवडणुकीत एका उमेदवाराचा खून केला होता. २०१५ मध्ये सुनावणीसाठी हजर केले जात असताना त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने तो पळून गेला होता. त्यानंतर त्याला परत अटक झाली. (Sidhu Moosewala Murder)

२०२१ पासून बिश्नोई तिहार जेलमध्ये आहे. पण त्याचा बाहेरील जगाशी संपर्क कमी झालेला नाही. द प्रिंटने दिलेल्या वृत्तात बिश्नोई आणि त्याचे साथीदार व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करतात. इंटरनेवरून फोन कॉल करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे बिश्नोई भारतातील तसेच कॅनडा, अर्मेनिया, लंडन येथील त्याच्या सहकाऱ्यांशी संपर्कात राहातो. अशा प्रकारे कॉलची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचे सर्व्हर भारता बाहेर असल्याने भारतातील तपास संस्थांना त्याचा नीट माग ठेवणे कठीण जाते, असे या वृत्तात म्हटले आहे. (Sidhu Moosewala Murder)

Back to top button