बीड : पावसामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला सरपंचांनी दिला मदतीचा हात

बीड : पावसामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला सरपंचांनी दिला मदतीचा हात

आष्टी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवळाली येथे शनिवार (दि. १८) झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आष्टी तालुक्यातील देवळाली येथील आजिनाथ आनंदा खाडे यांच्या घरांची पडझड झाली. घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला. जीवनावश्यक वस्तू पावसात भिजल्याने कुटुंब चिंताग्रस्त होते. सरपंच पोपटराव शेकडे यांनी त्यांना तात्काळ मदत केली. तर, या भागांतील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांच्या फळबागांच्या विक्रीचे व्यवहार सुद्धा झाले होते. अशा प्रकारे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान कोलमडले आहे. यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच सरपंच पोपटराव शेकडे यांनी तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी ग्रा.प.सदस्य विठ्ठल तांदळे, गणेश खाडे, दत्तात्रय नवले,सह आश्रुबा खाडे, भगवान खाडे, भगवान जवणे,दादा खाडे,शहाराम नागरे, दादा कावेदार यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

देवळाली (ता.आष्टी) येथे काल (दि. १८) रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे आजिनाथ आनंदा खाडे यांचा संसार उघड्यावर आला आहे त्यांच्या कुटुंबांच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त परिवाराची भेट घेऊन सरपंच पोपटराव शेकडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तात्काळ तलाठी नरसाळे, कृषी सहाय्यक यांना याबाबत माहिती देत नुकसानग्रस्त नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची शासकीय मदत जाहीर करण्यास सूचना दिल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news