

देहूरोड :
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने यावर्षी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून कॅन्टोन्मेंट हद्दीतील कचरा मोशी कचरा डेपोत टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय कॅन्टोन्मेंट बोर्डाचे इंद्रायणी दर्शन येथील श्रेडींग मशिनमध्येही कचरा विघटन करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.7) झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी बोर्डाचे अमन कटोच होते. बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य कैलास पानसरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने हे उपस्थित होते. बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्यालय अधीक्षक राजन सावंत उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने अतिक्रमण केलेली बांधकामे हटविण्यासाठी जेसीबी यंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी 37 लाख 35 हजार रूपयांची तजवीज करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जन औषधी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या धर्तीवर हे केंद्र बोर्डाचे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात येणार आहे. त्याचा लिलाव होणार आहे. पवना जल उपसा केंद्रावर 125 हॉर्स पॉवरची मोटार बसवली आहे. ही मोटार दिवसभर सुरू असल्याने तिच्यावर लोड येतो. तिला जास्त काळ झाल्याने आता दीडशे ते अडीचशे क्षमतेची मोटर बसविण्यात यावी असा सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला. अध्यक्षांनी तो मान्य केला.
https://youtu.be/7KwsutS10qQ