झाडांचे टेंडर, नको रे बाबा..! पुन्हा निविदा करण्याची मनपावर वेळ; एक कोटीचे टेंडर परवडेना | पुढारी

झाडांचे टेंडर, नको रे बाबा..! पुन्हा निविदा करण्याची मनपावर वेळ; एक कोटीचे टेंडर परवडेना

नगर: पुढारी वृत्तसेवा

महापालिका उद्यान विभागातर्फे चार प्रभाग समितींच्या हद्दीत प्रत्येकी 1250 झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपाने एक कोटींचे टेंडर काढले होते. परंतु, टेंडर भरूनही ठेकेदारांनी सर्वच साहित्याचे दर वाढल्याने टेंडर परवडत नसल्याने मनपाला कळविले. त्यामुळे पुन्हा नव्याने टेंडर करण्याची वेळ मनपावर आली आहे.

महापालिकेच्या वतीने दरवर्षी शहरातील उपनगरामध्ये ओपन पेस, नव्याने झालेल्या कॉलनी, नवीन रस्ते आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येते. गतवर्षी सावेडी उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात वृढ लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमृत अभियानांतर्गत काही नव्याने होणारी उद्याने ठेकेदारांना विकसित करण्यासाठी दिली होती. त्यांनी झाडे लावून त्याची दखभाल करण्याचे नियोजन ठेकेदारांकडे दिले आहे.

महापालिकेतर्फे यावर्षी पाच झाडे झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मनपाने रितसर एका कोटी रुपयांची निविदा काढली होती. ती निविदा दोन ठेकेदारांनी भरली. मात्र, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्टील व अन्य साहित्य दर वाढल्याने ठेकेदारांनी काम करण्यास असमर्थता दशविली. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा नव्याने टेंडर काढण्याची वेळ आली आहे. सध्या स्टील, झाडे, खते याचा नव्या किमतीनुसार आरखडा तयार करून द्यावा, त्यासाठी शहर अभियंत्याकडे प्रस्ताव पाठविले आहे. शहर अभियंत्याने नव्या दरानुसार आरखडा तयार केल्यानंतर पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

पिडितेची आरोपीच्या बाजूने साक्ष तरीही..! फिर्यादी असलेली पत्नी ठाम राहिली, पतीला सक्तमजुरी

इथे होणार वृक्षारोपण

शहरातील प्रभाग समितीनिहाय वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी झेंडी गेट, जुनी मनपा, सावेडी, बुरूडगाव रोड या प्रभाग समितीत प्रत्येकी 1250 झाडे लावण्यातील. ज्या विभागात ओपन पेस व मोकळ्या जागात आहेत तिथेही वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
याचे दर वाढले..

झाडांचे खड्डे, त्यासाठी लागणारी माती, खते, स्टील, झाडे याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे काम करणे परवडत नसल्याचे ठेकेदारांनी मनपाला पत्राद्वारे कळविले.

शहरात पाच हजार झाडे लावण्याबाबत एक कोटीची निविदा काढण्यात आली होती. मात्र, काम परवडत नसल्याचे सांगत ठेकेदारांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे आता सुधारित दरानुसार पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
– शशिकांत नजन उद्यान विभागप्रमुख.

Back to top button