कांद्याला चौदाशे रुपये भाव; जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर | पुढारी

कांद्याला चौदाशे रुपये भाव; जाणून घ्या आजचे दर एका क्लिकवर

नगर : पुढारी वृत्तसेवा

स्व. दादापाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत सोमवारी (दि. 30) कांद्याला चौदाशे रुपये दर मिळाला, तर 28 हजार 782 कांदा गोण्यांची बाजार समितीत आवक झाली होती. नगर बाजार समितीसह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर कोसळले होते.

कांदा अगदी पाच रुपयांपर्यंत येऊन पोहोेचला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च मिळणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी उन्हाळी कांदा शेड व भुसारामध्ये साठवून ठेवला आहे. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर भुसार व शेड नसणार्‍यांनी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत होते.

परंतु, कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत होता. आता पावसाळ्याच्या तोंडावर बाजार समितीत कांद्याची जास्त आवक होऊ लागली आहे. त्यात सोमवारी(दि. 30) नगर बाजार समितीत एक नंबर कांद्याला चौदाशे रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आजचे कांद्याचे दर

एक नंबर : 1000 ते 1400
दोन नंबर : 700 ते 1000
तीन नंबर : 300 ते 700
चार नंबर : 100 ते 300

हेही वाचा

शिक्षक बँकेचे 10464 मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध,13 जूनला प्रोग्राम?

इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग एक उत्तम पर्याय

सांगली : तंबाखूमुळे दरवर्षी 10 लाख जणांचा मृत्यू

Back to top button