नेवासा शहरात भाजपला खिंडार, मुरकुटेंचे कट्टर समर्थक राजेंद्र मापारी यांच्या हाती शिवबंधन | पुढारी

नेवासा शहरात भाजपला खिंडार, मुरकुटेंचे कट्टर समर्थक राजेंद्र मापारी यांच्या हाती शिवबंधन

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र मापारी यांनी कार्यकर्त्यांसह मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.28) हाती शिवबंधन बांधलेे. त्यामुळे नेवासा शहरात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे. नेवासा नगरपंचायत प्रभाग क्र. 14 मधील नगरसेविका सीमा मापारी या राजेंद्र मापारी यांच्या पत्नी आहेत.

Nigeria Stampede : नायजेरियातील चर्चमधील चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गळती सुरू आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असलेले राजेंद्र मापारी व युवकांचे संघटन असलेले भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष पर्यंत विविध पदे भूषविलेले स्वप्नील मापारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नेवासा शहरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

महाबळेश्वरची 35 कोटींची डॉपलर रडार यंत्रणा कुचकामी

यावेळी कहार समाजाचे व भाजप युवा मोर्चाचे उपशहराध्यक्ष शरद पंडुरे, सोमेश मापारी, सागर पंडुरे, अनिकेत मापारी, गणेश चौधरी, तुषार परदेशी, अजय रासने, प्रवीण गायकवाड, समीर मापारी, प्रसाद मापारी, आशिष मापारी, गौरव राहुरकर, तेजस मापारी, शिवाजी शेजूळ, राहुल म्हस्के, अक्षय करंडे आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी जाकीर शेख, अनिल शिंदे, अजिंक्य जगताप, सौरभ मुनोत व अभिषेक गाडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंकीपॉक्सचा धोका किती?

Back to top button