Jalgaon : 4 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकासह सरपंच पतीला रंगेहाथ अटक | पुढारी

Jalgaon : 4 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेवकासह सरपंच पतीला रंगेहाथ अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यामधील (Jalgaon) पाचोरा तालुक्यातील वरसाडे ग्रामपंचायतीत काम करणार्‍या रोजगार सेवकाला मानधन दिले जाते. या मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात सुमारे 4 हजारांची लाच घेणार्‍या ग्रामसेवक आणि सरपंच पतीला रंगेहाथ अटक करण्यात आली.

जळगाव (Jalgaon) लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 24) दुपारी 2.30च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ही कारवाई केली. वरसाडे (ता. पाचोरा) ग्रामपंचायत कार्यालयात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मिळणार्‍या मानधनाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे ग्रामसेवक काशीनाथ राजधर सोनवणे (52) यांनी स्वतःसाठी व महिला सरपंच पती शिवदास राठोड (67) यांच्यासाठी प्रथम पंचांसमक्ष सहा हजार रुपये, तर तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी केली. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. एसीबीच्या पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचत लाचेची रक्कम घेताना ग्रामसेवक आणि सरपंच पतीला रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा :

Back to top button