जलपर्णीमुळे गुदमरली इंद्रायणी !………. | पुढारी

जलपर्णीमुळे गुदमरली इंद्रायणी !..........

तळवडे :

परिसरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीला जलपर्णीचा विळखा पडला असल्यामुळे नदीच्या प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जलपर्णी काढून नदीचा प्रवाह मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.  देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी नदी महाराष्ट्रातील असंख्य वारकर्‍यांसाठी पवित्र मानली जाते.

कांदा पंधरा रुपये किलोवर आल्याने सामन्यांना मोठा दिलासा

याच नदीला तळवडे परिसरात जलपर्णीचा विळखा पडलेला दिसत आहे. तळवडे येथील नदी परिसर कायम दुर्लक्षित राहिला असून, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत. तळवडे येथील आयटीपार्कला लागून इंद्रायणी नदी वाहते. या नदीवर पूर्वी गावाचा संपूर्ण शिवार सुजलाम सुफलाम व्हायचा. परंतु, आता मानवनिर्मित प्रदूषण व माणसाची स्वार्थी वृती नदीच्या बकालपणाला कारणीभूत ठरत आहे.

Gold Tea : ऐकावे ते नवलच..! आला साेन्‍याचा चहा, प्रतिकिलाे अडीच लाख रुपये!

देहू ते तळवडे परीसरात इंद्रायणी नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे अच्छादन निर्माण झाल्याने नदीला हिरव्या कुरणाचे रूप आले आहे. चाकण औद्योगिक वसाहत व तळवडे आयटीपार्क यांच्या सीमेवर निघोजे व तळवडे या गावांना जोडल्या जाणार्‍या बंधार्‍यालगत नदीची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

ज्ञानवापी वादाचं लोण पुण्यात? पुण्येश्वर,नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्गा असल्याचा अजय शिंदेंचा दावा

आज विकासाच्या मागे धावणार्‍या माणसांनी नवीन पूल व रस्ता बांधला असला तरी निघोजे व तळवडे या दोन गावांना जोडणारा एकमेव दुवा असणारा बंधारा व या परिसरातून वाहणार्‍या नदीची झालेली दयनीय अवस्था प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे.
तळवडे व निघोजे येथील शेतकरी आजही या नदीवरील पाण्याने आपली शेती जोपासत आहेत. परंतु, या पसरलेल्या जलपर्णीमुळे शेतकरी ही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकीर जलपर्णी काढून नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची मागणी केली आहे.

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय खळबळ, नितीश कुमारांचे फर्मान- आमदारांनी पुढील ७२ तास पाटणाबाहेर जाऊ नये

Back to top button